ऊर्जा मंत्री नागपुरात आहेत. दिल्लीच्या धरतीवर वीज बिल देण्यात येईल, असं ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं होतं. मात्र, आता बिलाचे सुलभ हप्ते करु, असं ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं.
नागपूर : जनतेला एकत्रित वाढून येत असलेल्या वीज (BJP Will Protest Against The Excess Electricity Bill) बिलविरोधात भाजप रस्त्यावर उतरणार आहे. जनतेने आपलं बिल आम्हाला आणून द्यावं, त्यासाठी वेगवेगळ्या भागात डब्बे ठेवणार असल्याचं भाजपने सांगितलं. कोरोनाच्या संकटात जनतेला वीज बिल एकत्रित दिलं जात आहे, हा जनतेशी धोका आहे, असा आरोप भाजपने केला आहे (BJP Will Protest Against The Excess Electricity Bill).
ऊर्जा मंत्री नागपुरात आहेत. दिल्लीच्या धरतीवर वीज बिल देण्यात येईल, असं ऊर्जामंत्र्यांनी सांगितलं होतं. मात्र, आता बिलाचे सुलभ हप्ते करु, असं ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं. ही जनतेसोबत धोका आहे.
तीन महिने सरासरी वीज बिल दिलं, त्याप्रमाणे आता एक-एक महिन्याचे बिल तपासून द्यावे. नागरिक संकटात आहे, अशा परिस्थितीत 100 युनिटची स्लॅब 300 युनिट करावी. मध्य प्रदेश सरकार प्रमाणे 100 युनिटचं वीज बिल माफ करावं, अशी मागणी भाजपने केली आहे (BJP Will Protest Against The Excess Electricity Bill).
जनतेने आपलं बिल आमच्यापर्यंत आणावं, त्यासाठी आम्ही ठिकठिकाणी डब्बे ठेऊ. त्यात झेरॉक्स टाकावी. ते आम्ही सरकारपर्यंत पोहोचवू. मात्र, सरकारने ऐकलं नाही, तर याविरोधात कोव्हिडचे नियम पाळत रस्त्यावर उतरुन आम्ही ठिकठिकाणी आंदोलन करु, असं भाजपने पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं.