खैरीच्या दिल्ली पब्लिक स्कुल ला 23 लक्ष 63 हजार 998 रुपये कर तात्काळ भरण्याचे आदेश
कामठी:-कामठी तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील मालमत्तावर कर लावण्याचे अधिकार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 124 व 31डिसेंबर 2015 च्या ग्रामविकास विभागाच्या अधिसूचनेनुसार इमारतीच्या मूल्यांकणावर आधारित कर आकारणी पद्धती लागू असून महाराष्ट्र कर फी नियम 1960 मधील नियम 7(4)(क)नुसार संस्थेच्या नावाने असलेल्या ईमारतिचा वापर शैक्षणिक प्रयोजनासाठी होत असल्यास कर सवलत देण्याची तरतूद आहे यानुसार खैरी ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या दिल्ली पब्लिक स्कुल ला 23 लक्ष 63 हजार 998 रुपयांचे मागणी बिल आकारले आहे मात्र या कर आकारणीत सदर इमारत ही शैक्षणिक प्रयोजनासाठी होत असल्याने यावर दिल्ली पब्लिक स्कुलच्या वतीने करण्यात आलेल्या आक्षेपावर पंचायत समिती गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी यांच्याकडे करण्यात आलेल्या अपिलात खैरी ग्रा प सरपंच व सचिव तसेच श्री चिरंजीवलाल बजोरिया एज्युकेशनल सोसायटी द्वारा संचालित दिल्ली पब्लिक स्कुल खैरी यांच्या वतीने असलेले प्रतिनिधी रवींद्र प्रयाग प्रसाद यादव यांची झालेल्या सुनावणीत दिल्ली पब्लिक स्कुल खैरी ची जागा ही शाळेच्या मालकीची नाही तसेच सादर केलेल्या शाळेच्या इमारतिच्या सातबारा नोंदीनुसार खैरी ग्रा प हद्दीतील ज्या जागेवर दिल्ली पब्लिक स्कुल ची इमारत उभी आहे ती जागा मे.अरुअभिषेक रिअलटर्स ली.तर्फे अधिकृत संचालक रेखा राजेंद्र बजोरिया यांचे नावे असून सदर संस्थेच्या वतीने दिल्ली पब्लिक स्कुल च्या इमारत जागेच्या मालकाला भाड्यापोटी शुल्क दिले जाते यावरून दिल्ली पब्लिक स्कुल खैरी ला महाराष्ट्र ग्रा प कर व फी नियम 7(4)(क)मधील तरतुदीनुसार करसवलत देय नाही त्यामुळे दिल्ली पब्लिक स्कुल ला खैरी ग्रामपंचायत कडे 23लक्ष 63 हजार 998 रुपयांचा कर भरणा तात्काळ करण्याचे आदेश बीडीओ सचीन सूर्यवंशी यांनि दिले त्यानुसार दिल्ली पब्लिक स्कुल च्या वतीने खैरी ग्रा प ला कराचा भरणा करण्यात आला असून यानुसार तालुक्यातील अशा बहुतांश नामवंत शाळेला कर सवलत नाकारण्याचे प्रकार उघडकीस येणार असून संबंधित ग्रामपंचायत ला थकीत असलेला लाखो रुपयाचा कर मिळणार असल्याचे बीडीओ सचिन सूर्यवंशी यांनी सांगितले.
ग्रामपंचायत ही स्थानिक स्वराज्य संस्थेचा एक भाग असून ग्रामपंचायत ला मिळत असलेल्या विविध प्रकारच्या कर वसुलीतून ग्रामपंचायत चा कारभार चालत असतो यानुसार ग्रामपंचायत खैरी मार्फत 2015-16ते 2019-20पर्यंत दिल्ली पब्लिक स्कुल खैरी कडे थकीत असलेल्या 48 लक्ष 84 हजार 335 रुपयांची कराची मागणी करण्यात आली मात्र दिल्ली पब्लिक स्कुल ची इमारत खैरी ची मालमता क्र 60 ही जागा शैक्षणिक प्रयोजनार्थ उपयोगात येत असल्याने कर सवलत देण्यात यावी अशी ग्रा प ला मागणी करण्यात आली मात्र नियमानुसार कर सवलत देण्यात येत नसल्याचे कारण दर्शवून खैरी ग्रा प सरपंच मोरेश्वर उर्फ बंडू कापसे व सचिवाने पंचायत समिती गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी कडे धाव घेतली यावर बीडीओ सचिन सूर्यवंशी यांनि नुकतेच अपिलार्थी असलेले खैरी ग्रा प चे सरपंच व सचिव तसेच गैर अपिलार्थी श्री चिराजीवलाल बजोरिया एज्युकेशनल सोसायटी संचालित दिल्ली पब्लिक स्कुल खैरी ला बोलावून झालेल्या सुनावणीत दोघांना आपले म्हणने मांडण्याची संधी दिली .
दोन्ही पक्षातर्फे युक्तिवाद सादर करण्यात आला यानुसार झालेल्या अवलोकातून ग्रामपंचायत यांनी सुधारित कर आकारणी केली यानुसार दिल्ली पब्लिक स्कुल खैरी ची मालमत्ता क्र 60 ची करपोटी मागील कर 19 लक्ष 57 हजार 268 रुपये व चालू आर्थिक वर्षाचा कर रक्कम 4 लक्ष 6 हजार 730 रुपये असे एकूण 23 लक्ष 63 हजार 998 रुपयांचे मागणी कर सादर करण्यात आले तर गैर अपिलार्थी श्री चिरंजीवलाल बजोरिया एज्युकेशनल सोसायटी संचालित दिल्ली पब्लिक स्कुल खैरी यांच्या वतिने प्रतिनिधी रवींद्र प्रयाग प्रसाद यादव यांनी सादर केलेल्या इमारतीच्या जागेच्या 7/12उतारा वरील नोंदीनुसार ज्या जागेवर दिल्ली पब्लिक स्कुल ची संस्थेची करपात्र इमारत उभी आहे ती जागा मे.अरुअभिषेक रिअलटर्स ली तर्फे अधिकृत संचालक रेखा राजेंद्र बजोरिया यांचे नावे असून एकूण 6 हॅकटर क्षेत्रफळ जागा आहे तसेच दिल्ली पब्लिक स्कुल खैरी च्या संस्थेकडून जमिन मालक यास जमिनीच्या भाड्यापोटी शुल्क दिले जाते यानुसार सदर इमारत ही संस्थेच्या मालकीची नसून जागामालक हेच संस्थेचे संचालक असून भाड्यापोटी जगामालकाला संस्थेच्या वतीने शुल्क दिले जात असल्याने श्री चिरंजीवलाल बाजोरिया एज्युकेशनल सोसायटी संचालित दिल्ली पब्लिक स्कुलखैरी ला महाराष्ट्र ग्रामपंचायत कर व फी , नियम 1960 मधील नियम 7(4)(क),मधील तरतुदीनुसार करसवलत देय नसल्याचे आदेशित बीडीओ सूर्यवंशी यांनी करीत थकीत कराचा भरणा तात्काळ केल्याचे सांगताच दिल्ली पब्लिक स्कुल च्या वतीने कराचा भरणा करण्यात आला.ही यशस्वी कारवाही बीडीओ सचिन सूर्यवंशी, सरपंच मोरेश्वर उर्फ बंडू कापसे, सचिव अशोक कुळमेथे यांनी केली.
…संदीप कांबळे कामठी