नागपूर : शहरात घडणाऱ्या अनेक घटनांना आता सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचा फोडण्यात येते. यातच आता एक व्हिडिओ तुफान व्हायरल होताना दिसत आहे. तुकडोजी स्क्वेअरवरील ट्रॅफिक पोलीसाने एका सरकार कर्मचारी असलेल्या महिलेला वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पकडले. यानंतर तिला लाच देण्यास भाग पाडत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. या कृत्यानंतर त्या ट्रॅफिक पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे.
या व्हिडिओच्या माध्यमातून मंगळवारी एका ट्रॅफिक पोलिसाला शहरातील एका महिलेकडून लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. या पोलिसाने ट्रॅफिक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या चलक महिलेला 500 रुपयाची लाच मागितली. या पोलिसांने आधी या महिलेला 1,000 रुपयांची लाच मागितली होती. परंतु नंतर 500 रुपयांवर सेटलमेंट केली गेली. 27 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये एक वाहतूक पोलिस दुचाकीवर असलेल्या एका महिलेशी तीव्र चर्चा करताना दिसत आहे.
व्हिडीओमध्ये ती महिला असे म्हणताना दिसत आहे की, तुम्ही 300 रुपयांची मागणी करत असताना चालान करत आहात. तुम्हाला 300 पाहिजेत असे म्हणा आणि चालन रद्द करा. यावर र पोलीस म्हणतो, तुम्ही पैसे द्या. मी काहीही करत नाही. मी चालानची प्रत काढलेली नाही. मी तुमचा नंबर टाकला आहे, असे लाच घेणारा पोलीस त्या महिलेला सांगत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.