Published On : Sat, Jun 24th, 2023

नागपुरात २१ बौद्ध राष्ट्रांचे प्रतिनिधी दीक्षाभूमीला देणार भेट !

Advertisement

नागपूर : शहरात आज २१ बौद्ध देशांतून प्रतिनिधी दाखल होणार आहेत. गगन मलिक फाउंडेशन इंडिया, सर्वधर्म समभाव शांती संमेलन व जागतिक शांतता पुरस्कार सोहळा २०२३ चे आयोजन मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील आमला शहरात २५ जून रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी या प्रतिनिधीला आमंत्रित करण्यात आले आहे.

यापार्श्वभूमीवर रविवारी ते दीक्षाभूमीला भेट देतील. श्रीलंकेचे सामाजिक न्यायमंत्री विजयदासा राजबक्षे, लाइट एशिया फाउंडेशन श्रीलंकाचे अध्यक्ष नवीन गुणरत्ने, वैयक्तिक सहायक पंतप्रधान कार्यालय श्रीलंका सोक्या चोम, थायलंडचे बौद्ध विश्व आघाडीचे अध्यक्ष डॉ.पोर्नचाई पियापोंग, सिस्टर मिथिला (बांगलादेश), सबुज बरुवा (बांगलादेश), सिस्टर निन्ये (म्यानमार), डॉ.ली.कीट यांग (दुबई), फाय यान (व्हिएतनाम), डॉ.योंग मून (दक्षिण कोरिया), कॅप्टन नॅटकीट (थायलंड), डॉ.पोंगसांग (थायलंड) आणि इतर देशांतील बौद्ध प्रतिनिधी येणार आहेत.

Advertisement