नागपूर : भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND vs ENG) यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात झाली आहे. भारताकडून यशस्वी जैस्वाल आणि हर्षित राणा या दोघांनी भारताकडून वनडेमध्ये पदार्पण केलं आहे. पहिल्या वनडे सामन्यापूर्वी यशस्वी जैस्वाल आणि हर्षित राणा यांना एकदिवसीय पदार्पणाची कॅप्स देण्यात आली.
तर मोहम्मद शमी, कुलदीप यादव भारतीय संघात परत आले आहेत. पण सर्वात मोठा धक्का म्हणजे दुखापतीमुळे विराट कोहली पहिल्या वनडेमध्ये खेळताना दिसणार नाही. पण अखेरच्या क्षणी बीसीसीआयने वनडे संघात संधी दिलेल्या वरूण चक्रवर्तीला मात्र वनडे पदार्पणासाठी वाट पाहावी लागणार आहे.
पहिल्या वनडेसाठी भारताची प्लेइंग इलेव्हन-
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, शुभमन गिल, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी.
पहिल्या वनडेसाठी इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन-
बेन डकेट, फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद.