Published On : Wed, Jul 8th, 2020

शहरात या भागात आढळून आले रुग्ण,पॉझिटिव्ह रुग्णांची दोन हजाराकडे वाटचाल

Advertisement

नागपूर : रॅपिड अ‍ॅण्टीजेन चाचणीचा अहवाल १५ मिनिटात येत असल्याने जास्तीत जास्त कोरोनाबाधितांचा अहवाल प्राप्त होत आहे. परिणामी, संख्याही झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. नागपुरात रुग्णसंख्येची दोन हजाराकडे वाटचाल सुरू झाली आहे. बुधवारी यात ४९ रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या १९१४ वर पोहचली. यात तीन रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ३० झाली आहे. विशेष म्हणजे, मध्यवर्ती कारागृहात रॅपिड चाचणीमुळे २१ रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर कामठीत १३ रुग्णांची नोंद झाली.

जून महिन्यात आठ दिवसात पाच मृत्यूची नोंद झाली. आज नोंद झालेल्या तीन मृतांमध्ये दोन मेयो तर एक मेडिकलचा रुग्ण होता. मध्य प्रदेशातील सिवनी येथील ६८ वर्षीय रुग्णाचा मेयोमध्ये उपचार सुरू असताना मध्यरात्री मृत्यू झाला. या रुग्णाला टाईप टू मधुमेह व इतरही आजार होते. दुसरा रुग्ण हा ७१ वर्षीय अमरावती येथील राहणारा होता. या रुग्णालाही टाईप टू मधुमेह, उच्चरक्तदाब व इतरही आजार होते. मेयो रुग्णालयात उपचार सुरू असताना या रुग्णाचा आज मृत्यू झाला. तर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेला धरमपेठ येथील ७३ वर्षीय रुग्णाचे नमुने खासगी लॅबमध्ये पॉझिटिव्ह आल्याने मेडिकलमध्ये पाठविण्यात आले. या रुग्णाला श्वसनाचा गंभीर आजार होता. मेडिकलमध्ये उपचार सुरू असताना आज दुपारी मृत्यू झाला.

Gold Rate
Monday 31March 2025
Gold 24 KT 90,500 /-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg 101,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कारागृहातील पुन्हा २१ पॉझिटिव्ह

मध्यवर्ती कारागृहात अधिकारी, कर्मचारी व आता बंदिवान मोठ्या संख्येत पॉझिटिव्ह येत आहेत. आज पुन्हा २१ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. यात काही बंदिवान असल्याचे सांगण्यात येते. कारागृहात आतापर्यंत १४७ रुग्णांची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, सर्वच बंदिवानाची रॅपिड अ­ॅण्टीजेन चाचणी होणार असल्याने लवकरच कारागृहात किती रुग्ण आहेत ते सामोर येण्याची शक्यता आहे.

शहरात या भागात आढळून आले रुग्ण

एम्सच्या प्रयोगशाळेत १०, मेयोच्या प्रयोगशाळेत आठ, नीरीच्या प्रयोगशाळेत चार तर खासगी लॅबमधून सहा व कारागृहातून २१ असे ४९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. शहरातील पॉझिटिव्ह रुग्ण सोमवारीपेठ, मिनीमातानगर, भगवाघर चौक, कोराडी रोड, जाफरनगर, सुभेदार ले-आऊट, जुनी मंगळवारी, काटोल रोड, राजनगर व हिंगणा रोड या भागातील आहेत. याशिवाय मेयो रुग्णालयातून ११ तर मेडिकलमधून चार असे १५ रुग्णांंना सुटी देण्यात आली. आतापर्यंत १४०० रुग्ण बरे झाले आहेत.

संशयित : १९८८
अहवाल प्राप्त : २८०५३
बाधित रुग्ण : १९१४
घरी सोडलेले : १४००
मृत्यू : ३०

Advertisement
Advertisement