* मुख्यमंत्री कोविड निधी जिल्हाधिकाऱ्यांना स्वाधीन
* राज्यातील सेवानिवृत्त मत्स्यव्यवसाय अधिकाऱ्यांच्या सेवावृत्ती
नागपूर: राज्यात कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य शासनातर्फे मोठ्या प्रमाणात प्रभावी उपाययोजना सुरु आहे. कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आव्हानानुसार राज्यातील मत्स्यव्यवसाय विभागाच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-19 साठी एक लक्ष एक्केचाळीस हजार एकशे एक्कावन रुपयाचा धनादेश जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्याकडे दिला.
राज्यातील मत्स्यव्यवसाय विभागातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक लक्ष एक्केचाळीस हजार एकशे एक्कावन रुपये गोळा केले असून आज जिल्हाधिकारी यांना सेवानिवृत्त अधिकारी मनोहर भृशुंडी, ओंकार काळबांडे, छत्रपती चेटूले, अनिल अर्जूनकर, सागर रामटेके यांच्या हस्ते देण्यात आला.
सेवानिवृत्तीनंतरही कोरोनासारख्या संकटाच्या काळात मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-19 साठी निधी दिल्याबद्दल जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी अधिकाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले. सेवानिवृत्तीनंतरही कोरोना बाधितासाठी निधी गोळा करुन सहायता निधीसाठी दिल्यामुळे इतरांसाठीही आदर्श ठरणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.