![Court Verdict](https://www.nagpurtoday.in/wp-content/uploads/2016/06/Court-Verdict-600x300.jpg)
Representational Pic
Nagpur : आज दिनांक ५फेब्रुवारी २०२० रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश क्रमांक २ नागपूर न्यायालयाने कृष्णराव रघटाटे यांना १० वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व १०,००० रु दंडाची शिक्षा ठोठावली.आरोपी याने स्वतःचे पत्नीला (मृतक नामे सौ वनिता कृष्णराव रघटाटे )आपले सोमलवाडा ,नागपूर येथिल राहाते घरी संपत्ती विक्री च्या पैशाच्या वादावरून ,भांडण केले व मातीचे तेल टाकून पेटवून दिले.
ह्या खटल्यात फक्त ५ साक्षीदार सरकारी पक्षाने तपासले. ह्यात आरोपीचा मुलगा हिमांशू याची साक्ष अतिशय महत्त्वाची ठरली.
सरतपासणीत हिमांशू ने सर्व घटना आपल्या पोलिसांना दिलेल्या जवाबा प्रमाणे सांगितली, परंतु उलट तपासणीत त्याने आपला जवाब फिरविला व वडिलांना वाचविण्यासाठी प्रयत्न केलेत
परंतु सरकारी पक्षाने त्याला यानंतर फितूर घोषित करून उलट तपासणी केली
तसेच मृतक हिने मृत्यूपूर्वी आपला जवाब विशेष न्याय दंडाधिकारी यांना व पोलिसांना दिलेला होता
ह्या सर्व बाबींची सखोलपणे मांडणी करून आरोपीचा गुन्हा सिद्ध केला
त्यामुळेच जिल्हा न्यायाधीश श्री एस जे भरुका यांनी आरोपीला वरील शिक्षा सुनावली.
न्यायालयात सरकार तर्फे मुख्य जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी हा खटला चालविला
आरोपी तर्फे वकील पी ए देवतळे, एस के मोहीले यांनी काम पाहिले