नागपूर : पंतगाच्या नादात एका दहा वर्षीय मुलाला उच्च दाबाचा विजेचा शॉक लागल्याची धक्कादायक घटना समोर आली. या घटनेत मुलगा ४५ टक्के जळाल्याची माहिती आहे. यामध्ये त्याचा उजवा पाय कापावा लागला. त्याची प्रकृती चिंताजनक असून मेडिकलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहे.
माहितीनुसार,समता नगर येथील रहिवासी असेलला हा मुलगा १० जानेवारी रोजी सायंकाळी पतंग उडवित होता.अचानक त्याचा पतंग उच्च दाबाचा विद्युत लाईनवर अडकला. तो पतंग काढण्याचा प्रयत्नात असताना उच्च दाबाबा विजेचा शॉक बसला.हा शॉक इतका भयानक होता काही क्षणातच तो ४५ टक्के जळाला. त्याचा उजव्या पायाची बोटेच उडाली. त्याचे दोन्ही हात आणि डावा पायसुद्धा गंभीररित्या भाजला.
अशा स्थितीत त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, सहायक वैद्यकीय अधीक्षक डॉ. अक्षय सज्जनवार यांनी रुग्णाकडे धाव घेतली. प्लास्टिक सर्जन डॉ. नेहा गुप्ता व पेडियाट्रिक्स सर्जन डॉ. राजेंद्र सावजी यांनी उपचाराला सुरूवात असून सध्या मुलाची प्रकृती गंभीर आहे.