नागपुर :-दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने शासनाच्यावतीने विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. दिव्यांगांसाठी असलेल्या शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ घेण्यासाठी अपंगत्व वैद्यकीय प्रमाणपत्र अनिवार्य असते. वेळेत प्रमाणपत्र मिळाले नसल्याने दरवर्षी शेकडो दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास दिरंगाई होते. प्रत्येक दिव्यांगाला शासकीय योजनेचा लाभ मिळावा या उद्देशाने जिल्हाधिकारी कार्यालय, अपंग सक्षमीकरण विभाग, समाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार द्वारा नियुक्त महात्मा गांधी सेवा संघद्वारा कार्यान्वित जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, नागपूर महानगरपालिका नागपूर (शिक्षण विभाग), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जिल्हा परिषद, नागपूर (शिक्षण, आरोग्य व समाज कल्याण विभाग), इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयय, दिव्यांग व्यक्तीचे संमिश्र प्रादेशिक केंद्र (सीआरसी) नागपूर, जिल्हा शल्य चिकित्सक व सर्वोपचार रुग्णालय नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष मोहीम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.
नागपूर जिल्हाधिका-यांच्या संकल्पनेतून राज्यात प्रथमच १०० दिवसांची विशेष मोहिम कार्यक्रम १५ ऑगस्ट ते ३ डिसेंबर दरम्यान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत नागपूर शहरातील लाभार्थ्यांकरिता ५ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर दरम्यान प्राथमिक वैद्यकीय अपंगत्व तपासणी व निदान शिबीर घेण्यात येईल तसेच ११ सप्टेंबर ते १४ नोव्हेंबर २०१७ दरम्यान नागपूर जिल्ह्यातील ग्रामिण रुग्णालय व निवडक प्राथमिक आरोग्य केंद्र विशेष शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.
प्राथमिक वैद्यकीय अपंगत्व प्रमाणपत्र तपासणी व निदान शिबीराच्या पहिल्या टप्प्यात १९९५ कायद्यानुसार मतीमंद, कर्णबधिर, अस्थीव्यंग, अंध, राष्ट्रीय न्यास १९९९ नुसार आटिझम व बहुविकलांगांना लाभ घेता येईल. विशेष मोहीम कार्यक्रमासाठी काल सेंटर सुरु करण्यात आले असून अधिक माहिती करिता ९०२११०९८२८ या क्रमांका¬वर संपर्क साधता येईल .
शहर भागाकरिता संपर्क क्रमांक
– मतीमंद / आटिझम / बहुविकलांग प्रवर्गाकरिताः ७४४७४४६६९१
– कर्णबधिर प्रवर्गाकरिताः ७४४७४४६६९२
– अस्थिव्यंग प्रवर्गाकरिताः ७४४७४४६६९३
– अंध प्रवर्गाकरिताः ७४४७४४६६९४
ग्रामीण भागाकरीता संपर्क क्रमांक
– मतीमंद / आटिझम / बहुविकलांग प्रवर्गाकरिताः ७४४७४४६६९५
– कर्णबधिर प्रवर्गाकरिताः ७४४७४४६६९६
– अस्थिव्यंग प्रवर्गाकरिताः ७४४७४४६६९७
– अंध प्रवर्गाकरिताः ७४४७४४६६९८
सोबत आणायची आवश्यक कागदपत्रे (झेराक्स प्रत्येकी २ प्रती)
– अपंगत्वाचे वैद्यकीय प्रमाणपत्र (अपंगत्वाचे प्रमाणपत्र नसलेल्यांसाठी किंवा वर्ष २०१२च्या पूर्वीचे तात्पुरते प्रमाणपत्र व नुतनीकरण)
– नुकताच काढलेला आडिओग्राम (कर्णबधिरांकरीता)
– आधार कार्ड
– जन्माचा दाखला / बोनाफाईड सर्टिफिकेट
– रहिवासी दाखला (रेशन कार्ड, विज बिल इ.)
– ४ रंगीत पासपोर्ट छायाचित्रे
– उत्पन्नाचा दाखला किंवा दारिद्रय रेशेखालील पूरावा
नागपूर शहर भागाकरिता (झोन १ ते १०)
– आज ५ सप्टेंबर सकाळी ८ ते १ दरम्यान, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMC), नेत्र विभागाच्या बाजूला, मेडीकल चौक, नागपूर
नागपूर शहरातील नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांकरीता
– कल ०६ सप्टेंबर सकाळी ८ ते १ दरम्यान,जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMC), नेत्र विभागाच्या बाजूला, मेडीकल चौक नागपूर
नागपूर शहरातील नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांकरीता
– ०७ सप्टेंबर सकाळी ८ ते १ दरम्यान,जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMC), नेत्र विभागाच्या बाजूला, मेडीकल चौक नागपूर
नागपूर शहरातील नवीन लाभार्थी करीता
– ०८ सप्टेंबर सकाळी ८ ते १ दरम्यान,जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (GMC), नेत्र विभागाच्या बाजूला, मेडीकल चौक नागपूर
नागपूर शहरातील नवीन लाभार्थी करिता