नागपूर: भारतीय रेल्वेत दर वर्षाला ९०० रेल्वे कर्मचाºयांचा विविध घटनेत मृत्यू होतो. मृतांमध्ये ५० टक्के ट्रॅक मेंटनन्स कर्मचाºयांचा समावेश असतो. कारण भारतीय रेल्वेत २ लाख ७० हजार पदे रिक्त आहेत. यातही सरंक्षा संबधीत एक लाख ७० हजार पदांचा समावेश आहे. अशी माहिती नॅशनल फेडरेशन आॅफ इंडियन रेल्वेचे महासचिव एम राघवय्या यांनी पत्रपरिषदेत दिली. तसेच सरंक्षा संबधी आणि एकून रिक्त पदे तत्काळ भरावी आणि रेल्वे यंत्रणेला मजबुत करावे, अशी मागणी त्यांनी केली. सेंट्रल एक्झिकेटिव्ह कमिटीच्या बैठकीसाठी नागपुरात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
भारतीय रेल्वेत २ लाख २५ हजार ट्रॅक मेंटनन्स कर्मचारी आहेत. अंत्यंत जोखिमेचे काम त्यांना करावे लागते. डोळ्यात तेल घालुन ते काम करतात. त्यांच्या कर्तव्यदक्षतेमुळे प्रवाशांना नियोजितस्थळी सुखरुप पोहोचता येते. थंडी, उन आणि पाऊस तीन्ही ऋतून काम करतात.
त्यामुळे याठिकाणी तरुण कर्मचाºयांची ७ वर्ष नियुक्ती करावी. त्यानंतर दुसºया विभागात त्यांची बदली करावी. तरुण कर्मचारी धावपळ करण्यास अधिक सक्षम असल्याने त्यांच्याहातून ट्रॅक मेंटनन्सचे काम योग्य आणि चांगल्या पध्दतीने होईल. अशा प्रकारचा एक प्रस्ताव तत्कालिन रेल्वे मंत्र्यांना दिला होता. मात्र, त्या प्रस्तावावर अद्यापही विचार झाला नाही. ट्रॅक मेंटनन्स कर्मचाºयांचे प्रोत्साहन वाढविण्याच्या दृष्टीकोणातून सरकारने विशेष प्रयत्न करावेत, असाही प्रस्ताव रेल्वे मंत्र्यांना दिल्याचे त्यांनी सांगितले.
काही ठिकाणी कर्मचाºयांना आजही १२ तार ड्यूटी करावी लागते. त्यातही रिक्त पदांची भरती केली नाही. त्यामुळे कर्मचाºयांवर तणाव वाढून आरोग्य ढासळत चालले आहे. अपघाताचे प्रमाण वाढत आहे. या गंभीर प्रश्नाकडेही सरकारचे लक्ष केंद्रित केले आहे. नियमानुसार ८ तासांची ड्यूटी आहे. परंतु नियमाचे सर्रास उल्लघन करुन कर्मचाºयांकडून काम करुन घेतले जात आहे. कोच तयार करण्याºया कंपन्या देशात आहे. उत्तम दर्जाचे एलएचबी कोच तयार करण्याची क्षमात देशातील कर्मचाºयांकडे असताना विदेशी कंपनीशी करार करण्यात आला. त्यामुळे देशातील कारखाने बंद होण्याची पाळी आली आहे. विदेशी करार रद्द करुन देशातील कारखाने मजबुत करावे तसेच गुणवत्तापूर्ण कोचेस तयार करुन घ्यावे आणि विदेशातही पाठवावे.
अशा प्रकारचा प्रस्ताव केंद्र सरकारला देण्यात आला असल्याचे राघवय्या म्हणाले. याप्रसंगी सेंट्रल रेल्वे मजदुर संघाचे केंद्रिय अध्यक्ष डॉ. आर. पी. भटनागर, विभागीय कार्यकारी अध्यक्ष देबाशिष भट्टाचार्य, अमित भटनागर, विरेंद्र सिंग, ई व्ही राव, बंडू रंदई, राकेश कुमार आणि प्रविण वाचपेयी उपस्थित होते.
बुलेट ट्रेनची गरज नाही
सध्याच बुलेट ट्रेनची गरज नाही. २०५० नंतर बुलेट ट्रेनचा विचार करावा. आज रेल्वे यंत्रणा मजबुत करण्याची गरज आहे. दररोज २ कोटी ३६ लाख प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. योग्य त्या सुविधा प्रवाशांना मिळाव्यात. त्या दिशेने आधी विचार करणे गरजेचे आहे.
नविन पेेंशन योजना रद्द करा
भारतीय रेल्वेत नविन पेेंशन योजना आली आहे. या योजनेमुळे अनेक कर्मचाºयांचे नुकसान आहे. त्यामुळे नविन पेेंशन योजना रद्द करावी, अशी मागणी आणि प्रस्ताव सरकारला देण्यात आला. प्रत्येक रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन प्रस्ताव सादर करण्यात आला. मात्र, अद्याप निर्णय घेण्यात आला नाही. आणखी किती वर्ष प्रतिक्षा करावी, अन्यथा चक्का जाम करण्याचा विचार करावा लागेल.