Published On : Mon, Oct 7th, 2019

मनपाच्या हॉट मिक्स विभागाद्वारे दहाही झोनमधील 1031 खड्डे बुजविले

Advertisement

आयुक्तांच्या मार्गदर्शनात युद्रधपातळीवर काम सुरू : जेट पॅचर मशीनद्रवारे 319 रस्ते दुरूस्त

नागपूर: शहरातील रस्त्यांच्या खड्रड्रयांबाबत मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी गांभीर्याने दखल घेतल्यानंतर सर्वत्र खड्डे बुजविण्याचे कार्य युध्दपातळीवर सुरू आहेत. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मनपा आयुक्तांनी वेळोवेळी उपअभियंता, कार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंता यांच्या बैठक घेउन वेळोवेळी खड्डयांबाबत पाठपुरावा केला. त्याचे फलित पुढे येत आहे. 20 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीमध्ये मनपाच्या हॉट मिक्स विभागादवारे दहाही झोनमधील 1031 खड्डे बुजविण्यात आले आहेत.

Advertisement
Today's Rate
Sat 21 Dec. 2024
Gold 24 KT 76,400/-
Gold 22 KT 71,100/-
Silver / Kg 88,000/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

20 सप्टेंबरपासून 3 ऑक्टोबरपर्यंत 21 हजार 951 वर्ग मीटर रस्ता दुरूस्त करण्यात आला आहे. एक एप्रिलपासून शहरातील खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले असून एक एप्रिल ते 19 सप्टेंबरपर्यंत 2 लाख 9 हजार 776 वर्ग मीटर जागेतील 6728 खड्रडे बुजविण्यात आले असून आतापर्यंत एकूण 7659 खड्डे बुजविण्यात आले आहेत. याशिवाय 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीमध्ये जेट पॅचर मशीनद्वारे विविध भागातील 4715 वर्ग मीटर रस्त्यातील 319 खड्डे बुजविण्यात आली आहेत.

खड्रडयांच्या समस्येबाबत नागरिकांच्या वाढत्या तक्रारी आणि सुरक्षेच्या दृष्टीने मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. यासंबंधी 24 सप्टेंबरला सर्व उपअभियंता, कार्यकारी अभियंता व कनिष्ठ अभियंता यांची बैठक घेउन खड्डे बुजविण्याच्या कार्याला प्राधान्य देत याबाबत गांभीर्याने काम करण्याचे निर्देश दिले. यानंतर शहरात सर्वत्र रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कार्याला वेग आला.

मनपा आयुक्तांच्या शिफारशीवरून नागपूर सुधार प्रन्यासने हॉट मिक्स प्लांट सुरू केला असून या प्लांटच्या माध्यमातून नेहरूनगर, आसीनगर, लकडगंज या तीन झोनमधील खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहेत. यासाठी मनपातर्फे नागपूर सुधार प्रन्यासला 25 लाख रूपये अॅडव्हाॅन्स रक्कम देण्यात आली आहे. नागपूर सुधार प्रन्यासद्वारे करण्यात आलेले काम पाहता उर्वरित सात झोनमधील रस्त्यांचे खड्डेही नासुप्रच्या सहकार्याने बुजविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनपा आयुक्तांनी महा मेट्रो, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागीय, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण या विभागांनाही त्यांच्या कार्यक्षेत्रात येणारे खड्डे युध्दपातळीवर दुरूस्त करण्याचे आवाहन मनपा आयुक्तांतर्फे करण्यात आले आहे. शनिवारी (ता.5) आयुक्त अभिजीत बांगर यांनी महावितरणच्या अधिका-यांसोबत दौरा केला व रस्त्याची पाहणी केली.

20 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर या कालावधीमध्ये दुरूस्त झालेले रस्ते
प्रतापनगर चैक, उच्च न्यायालय ते जपानी उद्यान, मोठा ताजबाग, कॉफी हाउस चौक, मानकापूर फरास ते गोधनी रोड, तुकडोजी पुतळा वंजारीनगर, एल.ए.डी. कॉलेज चौक, एल.ए.डी. कॉलेज चौक ते जपानी उद्यान, मानकापूर झिंगाबाई टाकळी, तपोवन गोविंदनगर, धंतोली पूल (पुलाखाली), सी.पी. अॅंड बेरॉर ते राम कुलर, भरतवाडा रोड, भरतवाडा प्राथमिक स्कूल, पाटीदार भवन, मुंजे चौक, मॉडेल मिल चौक ते तुळशीबाग पूल, हिंगणा नाका, आयचित मंदिर ते गंगाबाई घाट, जायका मोटर्स रोड सिव्हील लाईन्स, अजनी पूल, डालडा कंपनी चौक जायका रोड, गंगाबाई घाट ते झेंडा चौक ते बडकस चौक, हजारीपहाड, रहाटे चौक ते आठरस्ता चौक, आकाशवाणी ते गुप्ता हाउस, गुप्ता हाउस ते एअर इंडिया, कडबी चौक, मंगलमूर्ती चौक ते जयताळा, गड्डीगोदाम, क्रीडा चौक, दिघोरी, खरबी, आयुर्वेदिक, खामला चौक ते आठ रस्ता चौक लक्ष्मीनगर, अग्रसेन चौक ते यादव समाज भवन, वाठोडा घाट, दीक्षित कॉलनी, भरतवाडा पारडी, मानस चौक, आठ रस्ता चौक, मानस चौक कॉटन मार्केट ते मोक्षधाम, आकाशवानी ते गड्डीगोदाम, मंद चौक लोहा पूल.

फुले मार्केट बर्डी, खामला मुख्य मार्ग, कार्गो टर्मिनल ते वर्धा रोड, छत्रपती चौक, सेमिनरी हिल्स ते फुटाळा चौक, गोरेवाडा ते फुटाळा, शांती नगर मुख्य मार्ग, राजविलास टॉकीज चौक ते भोला गणेश चौक, धरमपेठ परिसर, राजीव नगर चौक ते खामला चौक, रेल्वे स्टेशन, राम नगर चौक ते अमरावती रोड, मुंजे चौक सीताबर्डी, वडधामना नगर रोड, गड्रडीगोदाम चौक ते कडबी चौक, जपानी उद्यान ते राजभवन चौक, मेडीकल चौक ते क्रीडा चौक, फ्रेंड्स कॉलनी रोड, हिल टॉप राम नगर, गजानन नगर मेन रोड छत्रपती नगर.

Advertisement