– गाडीसह १,३१.६८०/- माल जप्त
– काटोल पोलिसांची कार्यवाही
काटोल : काटोल पोलीसानी स्टेशन हद्दीत चौरेपठार-भोरगड रोडवर नाकाबंदी करून टाटा इंडिका कार मधून 11 देशी दारूच्या पेट्या पकडल्या असल्याची घटना दि. 28 ला सायंकाळी 6.45 सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार –
चौरेपठार-भोरगड रोडने अवैधरित्या दारूच्या पेटया पांढऱ्या कारमध्ये वाहतुक होणार असल्याची गोपनीय माहिती काटोल पोलिसांना मिळाली. त्यावरून काटोल पोलीस स्टेशन मधील पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर व पोलीस स्टॉफ पोना /२०३३ ठोंबरे. पोशि/४५६ शेख, पोशि/२१२२ वाघमारे, वाहन चालक पोशी/२१९३ लेन्डे व असे सरकारी वाहनाने चौरेपठार शिवारात पोहचुन चौरेपठार-भोरगड रोडवर सायंकाळी १८.४५ वा सुमारास नाकाबंदी केली असता एक पांढऱ्या रंगाची कार कं. एम.एच.26/ एल-1720 टाटा इंडिका चा वाहनचालक ओकारसिंग टेलसिंग भोंड, (वय ४१), रा.कारंजा, ता. कारंजा, जि. वर्धा व त्याचा सहकारी सतनामसिंग टेलसिंग भोंड (वय ३६) रा.कारंजा, ता. कारंजा, जि. वर्धा यांचे ताब्यातील कारमध्ये ११ देशी दारूच्या पेट्या त्यावर देशी दारू संत्री १८०मि.ली, असे लेबल लागलेल्या प्रत्येक पेटीमध्ये ४८ निपा,
अशा एकूण 560 नीपा, प्रत्येकी निप कि ६०/-रू प्रमाणे एकुण कि ३१,६८०/-रू व एक पांढऱ्या रंगाची कार कं. एम.एच.26/ एल-1720 टाटा इंडिका किमत
१,००,०००/-रू असा १,३१.६८०/-रु चा माल जप्त करण्यात आला. सदर दोन्ही इसमाविरूध्द पोलीस स्टेशन काटोल येथे कलम ६५ (अ)(ई),८३ महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोना/२०३३ ठोंबरे हे करीत आहे. सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली
सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बोंद्रे, पोलीस उपनिरीक्षक संतोष निंभोरकर, पोना. सुनिल ठोंबरे. पोशि/फिरोज शेख, पोशि/मोहन वाघमारे, पोशि/अविनाश बाहेकर, पोशि/गणेश पालवे, पोशि/दिगांबर लेंन्डे यांनी केली.