नागपूर: विद्यार्थ्यांसाठी प्रतिक्षेत असलेला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता बारावीचा निकाल (12th Results) जाहीर झाला आहे. बोर्डाकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत निकालाची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे.
यंदा बारावीचा निकाल 93.37 टक्के लागला आहे.
कोकण विभाग ठरले अव्वल-
बारावी निकालाच्या टक्केवारीत कोकण विभाग अव्वल ठरला आहे. तर 91.95 टक्क्यांसह मुंबई विभाग तळाशी आहे. यंदाही बारावीच्या निकालात मुलींनी मारली बाजी मारली आहे. 95.44 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तर मुलांच्या निकालाची टक्कवारी 91.60 टक्के आहे.
संकेतस्थळावर पाहता येणार निकाल –
– mahresult.nic.in
http://hscresult.mkcl.org
– www.mahahsscboard.in
– https://results.digilocker.gov.in
– http://results.targetpublications.org