नागपूर : उज्जैनला देवदर्शनासाठी गेलेल्या व्यक्तीच्या घरातील दागीने व रोख असा एकुण १३ लाख ४४ हजार ५०० रुपयांच्या मुद्देमाल अज्ञात चोरटयांनी लंपास केला. ही घटना सोनेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी १४ नोव्हेंबरला सकाळी ८.३० ते शुक्रवारी १७ नोव्हेंबरच्या रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली.
माहितीनुसार, विकास उर्फ बंटी दिलीप वर्मा (वय ४४, रा. बांते ले आऊट, सोनेगाव) हे आपल्या घराला कुलुप लाऊन कुटुंबासह उज्जैनला गेले होते.अज्ञात आरोपीने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आलमारीत ठेवलेले सोन्याचे दागीने, डीव्हीआर व रोख ११ लाख ३९ हजार ५०० रुपये असा एकुण १३ लाख ४४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.
फिर्यादी वर्मा यांनी दिलेल्या तक्रारीवरून सोनेगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध कलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला शोधण्यास सुरुवात केली आहे.