नागपूर : नागपूर अमरावती महामार्गावरील कोंढाळी येथील ग्रामीण रुग्णालयाचा बांधकामासाठी सरकारने 13 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. याबाबतचा शासनादेश आज जारी करण्यात आला. कोंढाळी ग्रामीण रुग्णालयाला निधी मिळावा यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाठपुरावा केला. ग्रामीण रुग्णांसाठी निधी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री तथा नागपूरचे पालकमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानले आहेत. या रुग्णालयामुळे ग्रामीण भागातील नागरिकाना आरोग्य सेवेचा लाभ घेता येईल.
काटोल तालुक्यासह वर्धा जिल्ह्यातील बरीचशी गावे कोंढाळीशी जोडली आहे. यामुळे येथे ग्रामीण रुग्णालय व्हावे यासाठी 2013 प्रशासकीय मान्यता प्रदान केली होती. मात्र, दरम्यानच्या काळात खर्च वाढल्याने बांधकामासह पाणीपुरवठा, विद्युतीकरण, जमीन पातळीतील फरक आणि आकस्मिक खर्च वाढल्याने काम संथ झाले होते. प्रशासनाकडून निधीची मागणी केली.
महायुती सरकारकडे श्री बावनकुळे यांनी सतत पाठपुरावा केला. त्यांच्या या मागणीला प्रतिसाद देत 1221.97 लाख रुपयांचा निधीला मंजुरी दिली. ग्रामीण रुग्णालय, कोंढाळी ग्रामीण रुग्णालयाच्या उर्वरित कामासाठी लागणाऱ्या रकमेची
अर्थसंकल्पात तरतूद करण्याचा प्रस्ताव त्वरित शासनास सादर करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.