Published On : Mon, Mar 8th, 2021

१४ तास लसीकरण; ज्येष्ठांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा : महापौर दयाशंकर तिवारी

Advertisement

नव्या लसीकरण केंद्राचे केले उदघाटन

नागपूर: महापौर दयाशंकर तिवारी यांनी नागपुरातील नव्या लसीकरण केंद्राचे उदघाटन केले. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मेहंदीबाग आणि लकडगंज झोन अंतर्गत बाबूलबन लसीकरण केंद्राचे उद्घाटन केले. काल (दि. ५ ) गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयातील व्यवस्थेचीही पाहणी केली.

Today’s Rate
Friday 22 Nov. 2024
Gold 24 KT 77,700 /-
Gold 22 KT 72,300 /-
Silver / Kg 90,900/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपुरात दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांची लसीकरण केंद्रावर गर्दी व्हायला लागली. ऑनलाईन नोंदणीमध्ये अडचणी येत असल्या कारणाने अनेक नागरिकांनी लसीकरण केंद्रांवरच नोंदणीसाठी गर्दी करणे सुरू केले. यामुळे ज्येष्ठांना ताटकळत राहावे लागत होते. यावर तोडगा म्हणून झोन कार्यालयात ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था करण्यात आली. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला. यासोबतच शासनाच्या आदेशानुसार आता लसीकरण केंद्रांवर दोन पाळीत लसीकरण सुरू करण्यात आले. सकाळी ८ ते ३ आणि दुपारी ३ ते रात्री १० या वेळात सुमारे १४ तास लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी मानेवाडा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि गांधीनगर येथील इंदिरा गांधी रुग्णालयाला भेट दिली. येथे लसीकरण व्यवस्थेची पाहणी करून अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. मानेवाडा केंद्रांवर दररोज १०० पेक्षा अधिक ज्येष्ठांची लसीकरणासाठी गर्दी होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथे सामाजिक अंतराचे पालन करण्यात यावे, यासाठी आवश्यक ती व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

याप्रसंगी बोलताना महापौर दयाशंकर तिवारी म्हणाले, नागपूर महानगरपालिकेतर्फे ज्येष्ठांच्या सुविधेसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. आता मेहंदीबाग आणि बाबूलबन परिसरात लसीकरण केंद्राला नव्याने सुरुवात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे आता दोन पाळी सुमारे १४ तास लसीकरण सुरू करण्यात आले आहे. मनपाचे अधिकारी, कर्मचारी यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे. या कार्यक्रमात आपणही सहभाग घ्यावा. शनिवार, रविवारी घरी बसून आपल्या मोबाईलवर यासंदर्भातील संदेश लोकांना पाठवावे, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.

यावेळी उपमहापौर मनीषा धावडे, परिवहन सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर, आरोग्य समिती सभापती महेश महाजन, लकडगंज झोन सभापती मनीषा अतकरे, दुर्बल घटक समितीच्या सभापती कांता रारोकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संजय चिलकर, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, डॉ. विजय जोशी, डॉ. विजय तिवारी उपस्थित होते. यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांचा महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Advertisement