– कामठी तालुक्यात आजपावेतो 43 कोरोनाबधित रुग्णांची नोंद , 23 रुग्ण उपचार घेऊन बरे तर 20 रुग्ण अजूनही कोरोणाबधित
कामठी: सर्वत्र थैमान घातलेल्या कोरोना वोषाणूंचा प्रादुर्भाव नोयंत्रणात आणण्यासाठो कामठी तालुका प्रशासन सज्ज असला तरी तालुक्यातील कोरोनाबधित रुग्ण संख्या ही वाढीवरच आहे परवा 7 जुलै पर्यंत कामठी शहर कोरोनामुक्त झाल्याची चर्चा होती या चर्चेला विराम मिळत नाहो तोच दुसऱ्या दिवशी 8 जुलै ला बुटीबोरी च्या इंडोरामा कंपनीत काम करणारा व कामठी येथील कोळसा टाल रहिवासी इसम हा कोरोनाबधित आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत होते तर आज दुपारी 2 वाजता ह्याच कोरोनाबधित रुग्णांच्या कुटुंबातील 10 सदस्यांपैकी 9 सदस्य हे कोरोनाबधित आढळले तसेच त्याच्या संपर्कात आलेले दोन कर्मचारी हे सुदधा पॉजिटिव्ह आढळले तसेच जुनी कामठी पोलीस स्टेशन जवळील लक्ष्मी टॉवर रहिवासी एक इसम कोरोनाबधित आढळला तसेच तसेच नया बाजार परिसरात अजून एक इसम कोरोना पोजिटिव्ह आढळला तर भिलगाव रहिवासी एक महिला पोलीस कर्मचारी कोरोनाबधित आढळले यानुसार आज एकाच दिवशी शहरात 13 व ग्रामीण च्या भिलगाव येथील एक असे 14 रुग्ण कोरोनाबधित आढळले यानुसार कामठी तालुक्यातील कोरोणाबधित रुग्णांची संख्या ही 20 झाली असून यामध्ये शहरात 14 तर ग्रामीण मधील 6 कोरोनाबधित रुग्णांची संख्या आहे.
प्राप्त माहितीनुसार कामठी तालुक्यात पहिला कोरोनाबधित रुग्ण हा 12 एप्रिल 2020 ला लुंबिनी नगर येथे आढळला होता अशी कोरोनाबधित रुग्णांची संख्या ही तालुक्यात आजपावेतो 43 झाली होती यातील 23 रुग्ण हे उपचार घेऊन निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत तर यातील 20 रुग्ण हे कोरोनाबधित आहेत यामध्ये शहरात 14 तर ग्रामीण च्या 6 रुग्णामध्ये परसाड, नांदा, कोराडी, बिडगाव, भिलगाव, महादुला चा समावेश आहे .
काल कामठी च्या कोळसा टाल मध्ये कोरोणाबधित रुग्णची नोंद होताच काल तो परिसर प्रतिबंधित करण्यात आला होता मात्र आज एकाच दिवशी रुग्णांची झालेली 13 कोरोनाबधित रुग्णांची नोंद झाल्याने शहरातील वारीसपुरा, बुनकर कॉलोनी, नया बाजार परिसर हा प्रतिबंधीत करून या कोरिणाबधित रुग्णांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संपर्कात आलेल्या संशयितांना वारेगाव च्या कोविड सेंटर मध्ये कोरिनटाईन करण्यात आले तसेच कोरोनाबधित आढळलेल्या या सर्व रुग्णांना शास्कोय विलीगिकरन कक्षात उपचारार्थ हलविण्यात आले.
बॉक्स:-तहसीलदार अरविंद हिंगे-तालुक्यात कोरोनाबधित रुग्णसंख्या लक्षात घेता नागरिकांना सर्दी, खोकला , ताप, गळ्यात खवखव असे कोरोना ची संशयित लक्षणे आढळल्यास नागरिकांनी मनात कुठलाही नकारात्मक विचार न आणता आपल्या घरी दररोज सर्वेक्षण करायला येत असलेल्या सर्वेअर, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका , आरोग्य कर्मचारो तसेच लोकप्रतिनिधो यांना प्रत्यक्ष माहिती देऊन स्वतःची कोरोना तपासणी करून घेत स्वताचो काळजी घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे आव्हान तहसीलदार अरविंद हिंगे यांनी केले आहे.