नागपूर: कामठीच्या अंकित पल्प अॅण्ड बोर्डस तर्फे कोविडग्रस्तांच्या मदतीसाठी आणि उपाययोजनांसाठी सीएसआर फंडातून 15 लाख रुपये दिले. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या स्वाधीन त्यांनी हा चेक केला.
गेल्या 3 दशकांपासून ही कंपनी फार्मास्युटिकल क्षेत्रात यशस्वीपणे वाटचाल करीत आहे. याप्रसंगी कंपनीचे संचालक अनिल अग्रवालआणि राजेश अग्रवाल उपस्थित होते.
आदित्य अनघा सोसायटीतर्फे 11 लाख
आदित्य अनघा मल्टिस्टेट क्रेडिट को.ऑप. सोसायटीच्या कर्मचार्यांनी 11 लाख रुपयांचा चेक कोविडग्रस्तांच्या मदतीसाठी व उपाययोजनांसाठी ना. नितीन गडकरी यांच्या सुपूर्द केला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा सौ. अनघा सराफ, प्रबंध संचालक समीर सराफ व सचिव विशाल गुरव उपस्थित होते.