रायगड : रायगडमधील खालापूर येथील इर्शाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या इर्शाळवाडीवर बुधवारी रात्री दरड कोसळली. या दरडीच्या ढिगाऱ्याखाली ४० घरं दबली गेली आहेत. या घटनेत आतापर्यंत १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर १२० हून अधिक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
ख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींच्या उपचारांचा सर्व खर्च राज्य सरकार करणार असल्याचेही सांगितले. मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेनंतर एनडीआरएफ, एसडीआरएफ व स्थानिक बचाव दल घटनास्थळी बचाव कार्य करत आहेत. पण या भागात जेसीबी पोकलेन येऊ शकत नसल्याने फक्त मानवी स्तरावर बचावकार्य सुरू आहे
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तिथे दाखल झाले असून पालकमंत्री उदय सामंत, आदिती तटकरेही बारकाईने लक्ष ठेवून आहेत.