Advertisement
नागपूर : नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (NMRDA) १५१ फूट उंचीची श्री हनुमान मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे. ही स्थापना नागपूर येथील श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिर, कोराडी येथे करण्यात येईल.
यापार्श्वभूमीवर प्राधिकरणाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर ९.२५ कोटी किमतीच्या ई-निविदा मागवण्यात आल्या आहेत. दरम्यान नागपूर महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण ही महाराष्ट्रातील नागपूर शहराच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेली संस्था आहे. या अनुषंगाने प्राधिकरणाच्या माध्यमातून कोराडी येथे १५१ फूट उंच अशी हनुमान मूर्तीची स्थापना करण्यात येणार आहे.