नागपूर: अतिरिक्त आयुक्त डॉ. आर.झेड. सिद्दीकी यांच्यासह नागपूर महानगरपालिकेच्या सेवेत असलेले १६ कर्मचारी मंगळवारी (ता. २८) सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व तुळशी रोप देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मनपाचे अधीक्षक राजन काळे, विधी अधिकारी श्री. माटे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, संजय बागडे, मनपा कर्मचारी संघटनेचे महासचिव डोमाजी भडंग यावेळी उपस्थित होते. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये स्थानिक संस्था कर विभागातील मोहरीर पदावर कार्यरत मिलिंद मेश्राम, अतिक्रमण विभागातील हवालदार डी. एस. मडावी, चालक डी. एम. टिचकुले, व्ही. आर. डुले, स्थानिक संस्था कर विभागातील चपराशी नरेंद्र नारनवरे, उद्यान विभागातील मजदूर रत्नमाला गजभिये, फायलेरिया विभागातील क्षेत्र कर्मचारी सिद्धार्थ कावळे, शिक्षण विभागातील सहायक शिक्षिका मिनाक्षी खसाळे, सहायक शिक्षक प्रफुलचंद सुनेरी, मुख्याध्यापक वामन मून, मुख्याध्यापिका पुष्पा गावंडे, मुख्याध्यापिका शारदा क्षत्रिय, सहायक शिक्षिका मेहनाम बेगम नु. मोहम्मद, कर विभागातील कर संकलक लियाकत अली खान आणि आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी श्रीमती सुशील रगडे यांचा समावेश आहे. सर्व कर्मचाऱ्यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले. आभार संज़य बागडे यांनी मानले.