Published On : Wed, Sep 2nd, 2020

शहरात आणखी १६ कोव्हिड चाचणी केंद्र सुरु

Advertisement

चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी मनपाचा महत्वपूर्ण निर्णय : एकूण ५० केंद्र नागरिकांच्या सेवेत

नागपूर : शहरात कोव्हिडचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जास्तीत जास्त चाचण्या करून नागरिकांना वेळेवर उपचार मिळावे यादृष्टीने मनपातर्फे नवीन १६ कोव्हिड चाचणी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. या नवीन केंद्रांसह नागपूर शहरात आता कोव्हिड चाचणी केंद्रांची संख्या ५० झाली आहे.

शहरात वाढती कोव्हिड रुग्णांची संख्या आणि रोजचा मृत्यूदर रोखण्यासाठी चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. या सर्व ५० चाचणी केंद्रांवर सकाळी १० ते दुपारी २ या वेळेमध्ये काही ठिकाणी ‘आरटीपीसीआर’ आणि ‘अँटीजेन’ चाचणी केली जात आहे. ‘अँटीजेन’ चाचणीचा अहवाल ३० मिनिटांमध्ये माहित होतो. मात्र ‘आरटीपीसीआर’ चाचणीचा अहवाल येण्यासाठी कालावधी लागतो.
‘आरटीपीसीआर’ चाचणीचा अहवाल लवकर मिळावा यासाठीही मनपाद्वारे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. शहरात सध्या ‘आरटीपीसीआर’ चाचणीची ६ केंद्र असून लवकरच या केंद्रांचीही संख्या वाढविली जाणार आहे. सध्या नागपूर शहरात दररोज साधारणत: ४००० चाचण्या केल्या जात आहेत. ही संख्या वाढवून दररोज ५ हजार चाचण्या करण्यासाठी मनपाचे प्रयत्न सुरू आहेत. महापौर संदीप जोशी व मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांची जनप्रतिनिधींसोबत बैठक झाली होती. या बैठकीत झालेल्या चर्चेमध्ये कोरोनाच्या चाचणीची संख्या वाढविण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानुसार प्रशासनाद्वारे कार्यवाही करण्यात आली आहे.

Gold Rate
19 April 2025
Gold 24 KT 95,800 /-
Gold 22 KT 89,100 /-
Silver / Kg - 96,300 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कोव्हीडची लक्षणे असलेल्या व कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांनी प्राधान्याने आपल्या जवळच्या कोव्हिड चाचणी केंद्रात जाउन चाचणी करून घेणे आवश्यक आहे. जबाबदार वागणूक आणि सुरक्षितता हे कोरोनाला हद्दपार करण्याचे मोठे शस्त्र आहे. त्यामुळे कोणत्याही नागरिकाने आपल्यातील लक्षणे न लपविता वेळीच चाचणी करून योग्य उपचार करून घ्यावा. नागरिकांच्या सुरक्षेसाठी मनपा सदैव तत्पर असून आवश्यक माहितीसाठी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहनही मनपातर्फे करण्यात येत आहे.

नियंत्रण कक्षाचे क्रमांक
कोव्हिड चाचणी पॉझिटिव्ह असेल आणि लक्षणे असतील तर रुग्णालयात दाखल होण्यासाठी आणि कुठल्या रुग्णालयात बेड्‌सची उपलब्धता आहे, हे जाणून घ्यायचे असेल तर 0712 – 2567021 या क्रमांकावर कॉल करा. कोव्हीड संबंधीत इतर मार्गदर्शनासाठी 0712 – 2551866, 0712 – 2532474, टोल फ्री नं. 18002333764 या क्रमांकावर फोन करावे.

अ.क्र. झोन प्रभाग क्रमांक केंद्राचे नाव
लक्ष्मीनगर ३७ पोलिस प्रशिक्षण केंद्र (आर.पी.टी.एस.)
धरमपेठ १४ लॉ कॉलेज वसतीगृह, रवि भवन
  १५ मॉरिस कॉलेज वसतीगृह
आसीनगर पाचपावली पोलिस वसाहत
मंगळवारी १० राज नगर

 

अ.क्र. झोन प्रभाग क्रमांक केंद्राचे नाव
लक्ष्मीनगर ३८ जयताळा प्राथमिक आरोग्य केंद्र
१६ सोमलवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र
धरमपेठ १२ के.टी. नगर प्राथमिक आरोग्य केंद्र
१३ फुटाळा, तेलंगखेडी, हजारीपहाड प्राथमिक आरोग्य केंद्र आणि इंदिरा गांधी रुग्णालय
१५ डिक दवाखाना आणि बुटी दवाखाना
हनुमाननगर २९ हुडकेश्वर आणि नरसाळा प्राथमिक आरोग्य केंद्र
३४ मानेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र
धंतोली १७ कॉटन मार्केट प्राथमिक आरोग्य केंद्र आणि आयसोलेशन दवाखाना
३३ बाबुळखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र
नेहरूनगर २६ नंदनवन प्राथमिक आरोग्य केंद्र
२८ दिघोरी हेल्थपोस्ट
३० बिडीपेठ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मोठा ताजबाग
गांधीबाग मोमीनपुरा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नेताजी दवाखाना
१८ डाग्नेटिक सेंटर महाल प्राथमिक आरोग्य केंद्र
१९ भालदारपुरा प्राथमिक आरोग्य केंद्र
२२ दाजी दवाखाना
सतरंजीपुरा मेहंदीबाग प्राथमिक आरोग्य केंद्र आणि बिनाको फिमेल दवाखाना
२० जागनाथ बुधवारी प्राथमिक आरोग्य केंद्र
२१ शांतीनगर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि सतरंजीपुरा दवाखाना
लकडगंज २२ चकोले दवाखाना
२४ डिप्टी सिग्नल आणि आदिवासी मुलांचे वसतिगृह प्राथमिक आरोग्य केंद्र
२५ पारडी प्राथमिक आरोग्य केंद्र
आशीनगर कपिल नगर आणि शेंडे नगर प्राथमिक आरोग्य केंद्र
गरीब नवाज नगर
कुंदनलाल गुप्तानगर
बंदे नवाज नगर
१० मंगळवारी नारा प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जरीपटका दवाखाना
इंदोरा प्राथमिक आरोग्य केंद्र
११ झिंगाबाई टाकळी आणि गोरेवाडा प्राथमिक आरोग्य केंद्र
२२ सदर रोगनिदान केंद्र

Advertisement
Advertisement