·140 कोरोना पॉझिटिव्ह
·बरे झालेले रुग्ण 3645
·पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 5438
· क्रियाशील रुग्ण 1674
· आज 05 मृत्यू
· एकूण मृत्यू 119
भंडारा : जिल्ह्यात आज 165 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 3645 झाली असून आज 140 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 5438 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 67 टक्के आहे.
कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 53, साकोली 24, लाखांदूर 14, तुमसर 04, मोहाडी 14, पवनी 20 व लाखनी तालुक्यातील 11 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 3645 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 5438 झाली असून 1674 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 05 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 119 झाली आहे.
जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या- भंडारा- 2816, साकोली – 395, लाखांदुर- 236, तुमसर- 489, मोहाडी- 508, पवनी- 472 व लाखनी- 522 असे एकूण 5438 पॉझिटिव्ह रुग्ण आतापर्यंत जिल्ह्यात आढळून आले. यापैकी 3645 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 67 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 02.18 टक्के एवढा आहे.
आज 30 सप्टेंबर रोजी आयसोलेशन वार्ड मध्ये 196 व्यक्ती भरती असून 2049 व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.