नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या १८ सेवानिवृत्त कर्मचा-यांचा सत्कार शनिवार (ता.३०) मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात आज (ता. 30 डिसेंबर) आयोजित करण्यात आला. प्रामुख्याने निगम अधीक्षक राजन काळे, सामान्य प्रशासन विभागाचे श्री.कर्णिक, मोटघरे, कर्मचारी संघटनेचे महासचिव डोमाजी भडंग यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी मनपाच्या निवृत्त झालेल्या कर्मचा-यांना शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह व धनादेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. यामध्ये लोककर्म विभागाचे उपअभियंता एस.आर.वाटपाडे, शिक्षण विभागाच्या सहायक शिक्षिका अनुराधा मोहबे, साधना गर्ग, शशीकला बागडे, सहायक शिक्षक विजय ईमाने, आरोग्य विभागाचे कनिष्ठ लिपीक ए.सी.पाटील, कर विभागाचे मोहरीर श्री.आर.खापेकर, आरोग्य विभागाचे एस.टी.देवगडे, सफाई मजदूर गोविंदा वासनिक, देवीदास हरी गडपायले, प्रकाश मंदारे, ममता अमरसिंग बक्सरे, रमेश फुलझेले, भागिरथी तांबे, लोककर्म विभागाचे चपराशी श्रीराम पेंदाम, शहरी व कुटुंब कल्याण विभागाचे सुमीता गुप्ता, तुळसाबाई दुब्बलवार, ललीता चौधरी यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे संचालन डोमाजी भडंग तर आभारप्रदर्शन श्री.मोटघरे यांनी केले. यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी व अधिका-यांचे नातेवाईक प्रामुख्याने उपस्थित होते.