नागपूर: जय-दुर्गा उत्सव मंडळ, टेलिकॉम नगर , गेल्या १७ वर्षांपासून सातत्याने आणि उत्साहाने पारंपारिक पद्धतीने पारिवारीक तसेच पर्यावरणपूरक असा नवरात्री उत्सव साजरा करीत आहे. दरवर्षीप्रमाणे , ह्या वर्षी देखील श्री दुर्गा मातेचा आशीर्वाद घेऊन आणि पारंपारिक पद्धतीने ” चला रास गरबा खेळू या” असे म्हणत सर्व राणाप्रताप नगर अर्थात टेलिकॉम नगर, रामकृष्ण नगर, सेंट्रल एकसाइज कॉलोनी, गावंडे ले आउट आणि रवींद्र नगर ,दीनदयाल नगर वासियांनी १८ व्या वर्षीचा इको फ्रेंडली “दुर्गा उत्सव” साजरा करण्याचे ठरविले आहे. सर्व कार्यक्रम # स्थळ : रास गरबा मंडप हनुमान मंदिर जवळ, टेलिकॉम नगर नागपूर येथे होणार आहेत.
गेल्या बऱ्याच वर्षांपासून मंडळ संपूर्णपणे पर्यावरणपूरक अशी २ फूट पितळेची मूर्ती ची स्थापना करीत आहे. ऑक्टोबर १५ ला ढोल ताशा च्या गजरात भव्य मिरवणुकीनंतर माँ दुर्गेची स्थापना होईल .
आत्मनिर्भर भारत आणि व्होकल फॉर लोकल ह्या योजने अंतर्गत महिला उद्योजिका ह्यांना प्रोत्साहन मिळावे त्याखातर यावर्षी “जय दुर्गा उत्सव मंडळ आणि चार चौघी ग्रुप ह्यांच्या संयुक्त प्रयत्नाने ” एक दिवसीय महिला उद्योजिका प्रदर्शन” देखील येत्या १७ ऑक्टोबर ला घेण्यात येणार आहे ..दिनांक १९ ला “साई चरण पादुका दर्शन सोहळा ” आयोजित करण्यात आला आहे . श्री संत साईबाबा ह्यांनी वापरलेल्या ज्या त्यांनी श्री साई परमभक्त म्हाळसापती ह्यांना दिल्या होत्या त्यांच्या दर्शनाचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे .
ह्या वर्षी, गुरुवार दिनांक १९ ऑक्टोबर ते शनिवार २२ ऑक्टोबर पर्यंत ४ दिवस रात्री ८ ते १० ह्या दरम्यान पारंपारिक रास गरबा होणार आहे आणि ते हि अत्यंत पारिवारिक वातावरणात तसेच नि:शुल्क. दरवर्षी प्रमाणे इतर कार्यक्रम जसे सुगम संगीत, महिलांसाठी विविध स्पर्धा -पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा , लहान मुलासाठी फॅन्सी ड्रेस स्पर्धा , क्रीडा स्पर्धा , वरिष्ठ नागरिकांसाठी हेल्थ चेक उप कॅम्प देखील आयोजित करण्यात आल्या आहेत .
फक्त नवरात्री उत्सव च नव्हे तर २०२२-२३ ह्या वर्षभर कालावधीत जय दुर्गा उत्सव मंडळ तर्फे वर्षभर कार्यक्रम राबविण्यात आले, ज्या मध्ये जागतिक महिला दिन आणि टेलिकॉम नगर मधील वरिष्ठ महिलांचा सन्मान कार्यक्रम, गुढी पाडवा निमित्य महिलांची स्कूटर रॅली , शेगाव तीर्थाटन यात्रा इ .
जय दुर्गा उत्सव मंडळ आणि जय दुर्गा उत्सव महिला मंडळ चे सर्व पदाधिकारी नवरात्री कार्यक्रम राणाप्रताप नगर वासियांसाठी मुख्य आकर्षण ठराव ह्यासाठी कार्यरत आहेत.