Published On : Mon, Mar 20th, 2017

अभय योजनेमुळे पाच दिवसात २ .९४ कोटींची वसुली

Advertisement


नागपूर:
महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी थकबाकीदारांसाठी महापालिका प्रशासनाने ‘मालमत्ता कर अभय योजना-२००७‘ राबविण्याचा निर्णय घेतला. यात एकमुस्त थकीत मालमत्ता कर भरणाऱ्यांना दंडाच्या रकमेत ९० टक्के सूट दिली जात आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. १६ ते २० मार्च अशा पाच दिवसात ३,८८७ लोकांनी या योजनेचा लाभ घेतला. आतापर्यंत २ कोटी ९४ लाख ६ हजार ८४३ रुपयांची वसुली करण्यात आली.

महापालिकेने मालमत्ता कर थकबाकीदारांकडील थकीत रक्कम निकाली काढण्यासाठी अभय योजना सुरू केली. २३ मार्च पर्यंत दंडावरील रकमेत ९० टक्के सूट मिळणार असून दुसऱ्या टप्प्यात २४ ते ३१ मार्चपर्यंत कर भरणाऱ्यास दंडावर ७५ टक्के सवलत दिली जाईल.

Advertisement
Advertisement

Gold Rate
22 April 2025
Gold 24 KT 99,400 /-
Gold 22 KT 92,400 /-
Silver / Kg 97,000 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above