![](https://www.nagpurtoday.in/wp-content/uploads/2022/03/No-water-supply-to-many-areas-for-24-hrs-on-Mar-7-as-OCW-undertakes-work-600x400.jpg)
water crisis is a serious threats in India and worldwide
नागपूर: दाभा आणि टेकडी वाडी जलकुंभ यांना जोडणाऱ्या मुख्य जलवाहिनीवर जुने गोरेवाडा जलशुद्धीकरण केंद्राजवळ फार मोठी गळती आढळून आलेली आहे. ह्या गळती ला बंद करण्यासाठी नागपूर महानगरपलिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी दिनांक ६ जानेवारी (शुक्रवारी) १२ तासाचे इमरजंसी शटडाउन (सकाळी १० ते रात्री १०) घेतले आहे. ह्या इमरजंसी शटडाउन मुले पश्चिम नागपुरातील धरमपेठ झोन अंतर्गत येणारे दाभा आणि टेकडी वाडी असे २ जलकुंभ प्रभावित राहणार आहेत.
जानेवारी ६ (शुक्रवारी) पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग :
दाभा जलकुंभ: आशा बालवाडी , खाटीपुरा, वायुसेना नगर, गवळीपुरा, कृष्ण नगर स्लम , शिव पार्वती मंदिर , गायत्री नगर , खडगी आता चक्की, लायब्ररी रोड, मनोहर विहार , सरोज नगर, कृष्णा नगर ले आउट, चिंतामण नगर, भिवसेन खोरी , दंभ वस्ती, आदिवासी सोसायटी, वेलकम सोसायटी , ठाकरे ले आउट, संत जगनाडे ले आउट, संत ताजुद्दीन ले आउट, शिव्हरे ले आउट, न्यू शक्ती नगर, हिल व्हिव्यू सोसायटी, गंगानगर स्लम , शबीना सोसायटी , नशेमन सोसायटी . गायकवाड सोसायटी , अनुपम सोसायटी, कोलबास्वामी सोसायटी , शशिकांत सोसाटी, KGN सोसायटी , डुंबरे ले आउट, दत्त प्रसन्न सोसायटी गुरुदत्त सोसायटी, मकर धोकडा , जगदीश नगर , अखिल विश्व भरती सोसायटी, पोहरकर आता चक्की आणि नजीकचा परिसर , शिव नगर, आणि सुयोग्य नगर
टेकडी वाडी जलकुंभ : साई नगर, डोबी नगर, गुरुदत्त सोसायटी, जय मंगलमूर्ती सोसाटी , लोकमान्य नगर, साई पूर्णा सोसायटी, देशमुख ले आउट, जय-जिंद सोसायटी, भाकरे ले आउट, चिखली सोसायटी, अमृता सोसायटी, प्रशांत सोसायटी, वैष्णोमाता नगर , वैभव नगर, दांडेकर ले आउट , टेकडी वाडी स्लम आणि तळवलकर ले आउट.
ह्या १२ तासाचे इमरजंसी शटडाउन दरम्यान टँकर्सद्वारेही पाणीपुरवठा होणार नसल्याने, मनपा-OCWने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
कुठंल्याही प्रकारच्या अधिक माहितीकरिता नागरिक मनपा- OCW च्या नि:शुल्क मदत क्रमांक १८००- २६६-९८९९ वर आणि ग्राहक तक्रार सेवा ७०२८९०३६३६ वर संपर्क करू शकतात