Published On : Fri, Jun 1st, 2018

दुरंतो मधून २० लाखांचे दागिने जप्त

Advertisement

Duronto

File Pic


नागपूर: मुंबई – नागपूर दुरंतो एक्स्प्रेसच्या लीजवर असलेल्या एसएलआर बोगीतून १९ लाख ७५ हजार रुपये किंमतीचे दागिने आरपीएफच्या ( गुन्हे शाखा) पथकाने जप्त केले. यात हिरे, सोन-चांदी आणि आर्टिफिशल दागिण्यांचा समावेश आहे. ही कारवाई गुरुवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक ८ वर करण्यात आली.

क्विक कुरिअर लॉजिस्टिक सर्व्हिसेसने १२२८८९- मुंबईहून नागपुरला येणाºया दुरंतो एक्स्प्रेसने दागिण्यांचे पार्सल पाठविले. यात नागपुरातील सराफा व्यापाºयांचे दागिने होते. ही गाडी गुरुवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकाच्या होम फलाटावर पोहोचली. याविषयी आरपीएफच्या पथकाला आधीच गुप्त माहिती असल्याने मध्य रेल्वेचे विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त ज्योतीकुमार सतीजा यांनी रेल्वेतून होणारी तस्करी थांबविण्यासाठी एक पथक गठीत केले. या पथकात आरपीएफ निरीक्षक भगवान ईप्पर, प्रधान आरक्षक विजय पाटील, डी.डी. वानखेडे, शेषराव लांबट, किशोर चौधरी आणि निलकंठ गोरे यांचा समावेश होता. गाडी येण्यापूर्वीच पथक होम फलाटावर होते.

यावेळी पथकाने गाडीची झडती घेतली. एसएलआरची तपासणी करीत असताना संशयीत पार्सल विषयी विचारपूस केली. दरम्यान आलेली पार्सल घेण्यासाठी कुरीअर सर्व्हीसचा प्रतिनिधिही पोहोचला. त्याची आरपीएफ निरीक्षकांनी सखोल चौकशी केली. क्विक कुरिअर सर्व्हीस मध्ये काम करतो, तसेच मुंबईहून आलेल्या पार्सलमध्ये हिरे, सोने-चांदी आणि आर्टिफिशल दागिने असून संबधित व्यापाºयांना पोहोचविण्याचे काम करीत असल्याचे त्याने आरपीएफ निरीक्षकांना सांगितले. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता त्याला आरपीएफ ठाण्यात आनले, यावेळी सतीजा आणि निरीक्षक वीरेंद्र वानखेडे यांनी पार्सलमधील दागिण्यांसंबधी पावती किंवा काही पुरावा याविषयी विचारणा केली. मात्र, तो आरपीएफ पथकाला पावती देऊ शकला नाही. सर्वासमक्ष त्या पार्सल उघडण्यात आल्या. पुढील कारवाईसाठी आयकर विभागाशी संपर्क साधला. आयकर विभागाने संपूर्ण दागिने ताब्यात घेतले असून पुढील प्रक्रिया आणि कारवाई आयकर विभाग करणार आहे.

Gold Rate
Wednesday 12 March 2025
Gold 24 KT 86,400 /-
Gold 22 KT 80,400 /-
Silver / Kg 98,300 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

हिरे – २ लाख ७९ हजार ६९०
सोने – १३ लाख ९६ हजार ८९
चांदी – २ लाख ३५ हजार ५१२
आर्टिफिशल – ६४ हजार ५३२

Advertisement