Published On : Mon, Oct 23rd, 2023
By Nagpur Today Nagpur News

2024 ला राज्यात शिवशक्ती-भिमशक्तीचे सरकार येणार- प्रा. जोगेन्द्र कवाडे सर

व्हिडीओ कॉन्फरंस द्वारा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेची उपस्थिती
Advertisement

नागपुर.विद्यमान राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वातील लोकाभिमुख गतिमान आणि कृतीशिल असलेल्या सरकारच्या कार्यपध्दतीवर राज्यातील जनता समान व्यक्त करण्यात येत असुन यापूढेही २०२४ मध्ये महाराष्ट्रात एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना व पीपल्स रिपब्लिकन पार्टी गटबंधनातील शिवशक्ती व भिमशक्ती चे सरकार येईल असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी खासदार प्रा. जोगेन्द्र कवाडे यांनी नागपुर येथे पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनाप्रसंगी बोलतांना केले.

पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या या राष्ट्रीय अधिवेशना सोबतच संविधान सन्मान रैलीचे व्हिडीओ कॉन्फरंस द्वारा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या संविधान सन्मान रैलीच्या संबंधाने आपला संदेश देतांना मुख्यमंत्री म्हणाले कि, संविधानाचा सन्मान म्हणजेच देशाचा सन्मान असुन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळेच आज देश सुरक्षीत व अखंड आहे.

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 77,900 /-
Gold 22 KT 72,500 /-
Silver / Kg 90,600 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पूर्व संध्येवर दि. २३ ऑक्टोंबर २०२३ सोमवार रोजी आय.टी. कॉलेज च्या मैदानावर सायं. ६ वा. पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, लाँगमार्च प्रणेता माजी खासदार प्रा. जोगेन्द्र कवाडे सर यांच्या अध्यक्षतेखाली तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे यांच्या विशेष उपस्थिती मध्ये त्याचप्रमाणे देशभरातील विविध राज्याच्या प्रमुख नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आलेल्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये खालील प्रमाणे ठराव घेण्यात येत आहे.

राष्ट्रीय अधिवेशनातील मुख्य ठराव !!

ठराव क्र. १ :- शिक्षण क्षेत्रासह विविध क्षेत्रातील खाजगीकरण व कंत्राटीकरणाचा घेतल्या गेलेला निर्णय राज्य सरकारनी मागे घेतल्याबदद्ल मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांचे नेतृत्वातील राज्य सरकारचे अभिनंदन करण्यात येत आहे.
ठराव क्र. २ :- गायरान जमिनीवरील अतिक्रमित जमिनीचे अतिक्रमणधारकांना विना विलंब मालकी पटटे वितरीत करण्यात यावे.
ठराव क्र.३ :- महार वतनाच्या इनामी जमिनीवर झालेलया व होत असलेल्या अतिक्रमणास प्रतिबंध घालुन इनामी जमिनीच्या संरक्षणासाठी महार वतन इनामी जमिनी संरक्षण कायदा अमलात आणणे.
ठराव क्र. ४ :- सरकारी शाळांचा घेण्यात येत असलेल्या खाजगीकरणाचा निर्णय हा त्वरीत थांबवावा.
ठराव क्र. ५:- बेरोजगारांना बेरोजगारी भत्त्यासह त्यांना स्वयंरोजगारासाठी मदत देणे.
ठराव क्र. ६ :- बार्टीच्या प्रशिक्षण केन्द्राची व्याप्ती वाढवून उच्च शिक्षण व स्पर्धा परिक्षेसाठी
विदेशात पाठविल्या जात असलेल्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थी संख्येत वाढ करणे.
ठराव क्र.७ :- अंबाझरी उद्याना जवळीत उध्वस्त केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाचे पूर्णनिर्माण करण्याच्या घेतल्या गेलेल्या निर्णयाचे राज्य सरकारचे अभिनंदन करण्यात येत आहे.
ठराव क्र.८ :- धम्मदिक्षेच्या वेळेस ज्या ठिकाणी परमपुज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी वास्तव्य केले ते शाम होटेल धम्मक्रांती विहार व भीमसृष्टी उभारण्याच्या दिलेल्या मंजुरी करीता अभिनंदन करण्यात येत आहे.
ठराव क्र. ९ :- मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीत वाढ करून ती नियमित देण्याच्या दृष्टीने नियोजन करणे.
ठराव क्र. १०:- विविध समाजाच्या आर्थिक विकासासाठी विविध आर्थिक विकास महामंडळाद्वारे
लाभार्थ्यांना देण्यात आलेले कर्ज सरसकट माफ करण्यात यावे.
ठराव क्र. ११ :- राज्यात जलद गती न्यायालयाची निर्मिती करून अत्याचार प्रतिबंध कायद्या अंतर्गत नोदवल्या गेलेले गुन्हे लवकरात लवकर निकाली काढुन आरोपींना शिक्षा व्हावी.

अधिवेशन प्रारंभ होण्यापुर्वी सिताबर्डी स्थित पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या केंद्रीय कार्यालयापासुन ते अधिवेश स्थळ असलेल्या दिक्षाभुमीजवळच्या आय.टी.आय. कॉलेज मैदाना पर्यंत पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष युवानेते भाई जयदीप कवाडे यांच्या नेतृत्वात हजारो भिमसैनिकांच्या उपस्थितीत विशाल संविधान सन्मान रैली काढण्यात आलेल्या रैली प्रसंगी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, जगप्रसिध्द लाँगमार्च प्रणेते प्रा. जोगेन्द्रजी कवाडे सर यांच्यासह पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते मंडळी सहभागी होते.

चैत्यभूमी ते दीक्षाभूमी ‘मी रिपब्लिकन अभियान’ १४ नोव्हेंबर पासून

रिपब्लिकन आंदोलनाचा निखारा तेजस्वी करण्यासाठी पक्षाच्या वतीने मुंबईतील चैत्यभूमी ते नागपूर दीक्षाभूमी असे ‘मी रिपब्लिकन’ अभियान सुरू करण्यात येणार असून राज्यभरात संविधान जागरण यात्रा देखील आयोजित करण्यात येणार. असल्याची घोषणा पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे सर यांनी यापूर्वी केली आहे.

शिवसेनेकडून २ लोकसभा, १५ विधानसभेसाठी आग्रह

महायुतीच्या सरकारमध्ये शिवसेना आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आमची युती झालेली आहे आगामी निवडणुका आम्ही लढविणार आहोत. त्यात लोकसभेच्या दोन जागा आणि विधानसभेच्या १५ जागा आमच्या पक्षाला मिळाव्यात यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे आग्रह धरणार आहोत, असे जयदीप कवाडे असे यांनी सांगितले. यासंदर्भात पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.

Advertisement