Published On : Tue, Jan 21st, 2025
By Nagpur Today Nagpur News

एकाच दिवशी, एकाच परिसरात तब्बल 23 वीजचो-या उघडकीस

Advertisement

नागपूर: – नागपुरातील लष्करीबाग उपविभागा अंतर्गत असलेल्या एकता नगर वाहिनीवरील तब्बल 23 वीजचो-या एकाच दिवसात उघडकीस आणण्यात महावितरणला यश मिळाले आहे.

शहरातील अधिक हानी असलेल्या वाहिन्यांवर वीजचोरी पकडण्यासाठी महावितरणतर्फे विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेंतर्गत लष्करीबाग विभागांतर्गत कामठी रोड शाखा कार्यालयाच्या अखत्यारितील एकता कॉलनी वाहिनीवर सोमवार (दि. 20) रोजी नागपूर परिमंदलाचे मुख्य अबियंता दिलीप दोडके यांच्या मार्गदर्शनात तब्बल 23 वीजचो-या उघडकीस आल्या आहेत.

Gold Rate
Tuesday 21 Jan. 2025
Gold 24 KT 79,700 /-
Gold 22 KT 74,100 /-
Silver / Kg 92,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

या भागातील 40 ग्राहकांकडे तपासणी केली असता त्यात थकबाकीमुळे कायमस्वरुपी वीज पुरवठा खंडित असलेल्या 18 ग्राहकांकडे वीज वाहिन्यांवर थेट आकडे टाकून वीजचोरी होत असल्याचे आढळले याशिवाय 5 ग्राहकांकडे मीटर मधून थेट वीजचोरी होत असल्याचे आढळले, अत्यंत संवेदनशिल भाग असलेल्या एकता नगर वाहिनीवर विशेष पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबविण्यात आली.

या ग्राहकांनी केलेल्या वीजचोरीचे युनिट आणि रकमेची मुल्यांकन सुरु असून अधिक वीज हानी असलेल्या शहरातील तब्बल 25 वाहिन्यांसोबतच इतरही ठिकाणी विजचोरी विरोधातील ही मोहीम अधिक आक्रमकतेने राबविली जात आहे. यावेळी दिलीप दोडके यांच्यासोबत कार्यकारी अभियंता राजेश घाटोळे आणि संजय शृंगारे यांच्यासह अतिरिक्त कार्यकारी अभियंता हेमेंद्र गौर, शैलेश वाशिमकर आणि इतर अभियंते व कर्मचाह्री सहभागी झाले होते.

शहर मंडलातील काँग्रेस नगर, बुटिबोरी, सिव्हील लाईन्स, महाल आणि गांधीबाग या पाचही विभागात महावितरणतर्फे वीजचोरी विरोधातील धडक मोहीम सुरु करण्यात आली असून मागिल 20 दिवसात तब्बल 8 हजार 331 ग्राहकांकडील वीज जोडण्यांची तपासणी करण्यात येऊन तब्बल 428 वीजचो-या पकडण्यात आल्या आहेत.

विजचोरी हा सामाजिक अपराध असुन त्यामुळे महावितरण सोबतच समाजाचे देखील मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याने सर्व नागरिकांनी त्यांच्या परिसरात होत असलेल्या विजचोरीची माहिती स्थानिक भरारी पथके, सुरक्षा व अंमलबजावणी कार्यालये किंवा जवळच्या महावितरणच्या कार्यालयास देण्याचे आवाहन करण्यात आले असून. विजचोरी प्रकरणाची माहिती देण्या-या व्यक्तीस महावितरणकडून यथायोग्य बक्षिस दिल्या जात असून माहिती देण्या-यांचे नाव सुद्धा गोपनीय ठेवले जात असल्याची माहीती देखील महावितरणकडून देण्यात आली आहे.

Advertisement