मंगळवारी झोन, धंतोली झोन, गांधीबाग झोन, सतरंजीपुरा झोन आणि धरमपेठ झोन (सीताबर्डी भाग) चा पाणीपुरवठा २४ तास राहणार बाधित ….
शटडाऊन दरम्यान व नंतर.. बाधित भागांत टँकर पुरवठा देखील बंद राहणार..
नागपूर : नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी राजभवन (गव्हर्नर हाऊस ) स्थित ९०० मी मी व्यासाच्या जलवाहिनीवरील (बस बार वरील) मोठी गळती दुरुस्त करण्यासाठी तसेच राजभवन ते बोरियापुरा मुख्य जलवाहिनीवरील फ्लो मीटर लावण्याकरिता गोरेवाडा स्थित पेंच -१ जलशुद्धीकरण केंद्राचे २४ तासांचे तांत्रिक कामाकरिता शटडाऊन- मार्च २९ (मंगळवार) सकाळी १० ते मार्च ३० (बुधवार) सकाळी १० वाजेपर्यंत घेण्याचे नियोजित केले आहे.
या २४ तासाच्या पेंच-१ जलशुद्धीकरण केंद्र शटडाऊन कामांमुळे मंगळवारी झोन : राजभवन-सादर, राजभवन-राजनगर, गोधनी-गोरेवाडा , धंतोली झोन: रेशीमबाग जलकुंभ, हनुमान नगर जलकुंभ, वंजारी नगर जलकुंभ, वंजारी नगर (नवीन) जलकुंभ , गांधीबाग झोन : सीताबर्डी- फोर्ट जलकुंभ, सतरंजीपुरा झोन: बस्तरवाडी जलकुंभ, बोरियापुरा मुख्य जलवाहिनी, वाहन ठिकाना जलकुंभ, बोरियापुरा जलकुंभ आणि धरमपेठ झोन: राजभवन-सीताबर्डी मुख्य जलवाहिनी ह्या भागातील पाणीपुरवठा बाधित राहणार आहे .
तसेच शटडाऊन मधील तांत्रिक काम संपल्यावर मार्च ३० (बुधवार) ला पाणी पुरवठा वेळे नुसार त्या त्या बाधित भागातील पाणी पुरवठा सुरु होणार आहे ….ह्या २४ तासांच्या शटडाऊन कालावधी दरम्यान बाधित भागांना टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.
नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी ह्या भागातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे कि त्यांनी परिवाराच्या वापराकरिता पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे.
या २४ तासाच्या पेंच-१ जलशुद्धीकरण केंद्र शटडाऊन दरम्यान करण्यात येणारी कामे
१) राजभवन (गव्हर्नर हाऊस ) स्थित ९०० मी मी व्यासाच्या जलवाहिनीवरील (बस बार वरील) मोठी गळती दुरुस्त करण्यासाठी
२) तसेच राजभवन ते बोरियापुरा मुख्य जलवाहिनीवरील फ्लो मीटर लावण्याकरिता
३)पेंच १ जलशुद्धीकरण केंद्र येथील महत्वाची तांत्रिक देखभालीची तसेच विद्युत देखभालीची कामे ..
पेंच -१ जलशुद्धीकरण केंद्र शटडाऊन दरम्यान मार्च २९ (सकाळी १० ) ते मार्च ३० (सकाळी १० )बाधित राहणारे जलकुंभ :
मंगळवारी झोन : राजभवन-सदर, राजभवन-राजनगर, गोधनी-गोरेवाडा जलवाहिनीवरील सर्व भाग
धंतोली झोन: रेशीमबाग जलकुंभ, हनुमान नगर जलकुंभ, वंजारी नगर जलकुंभ, वंजारी नगर (नवीन) जलकुंभ ,
गांधीबाग झोन : सीताबर्डी- फोर्ट जलकुंभ वरील सर्व भाग ,
सतरंजीपुरा झोन: बस्तरवाडी जलकुंभ, बोरियापुरा मुख्य जलवाहिनी, वाहन ठिकाना जलकुंभ, बोरियापुरा जलकुंभ वरील सर्व भाग
धरमपेठ झोन: राजभवन-सीताबर्डी मुख्य जलवाहिनी ह्या भागातील पाणीपुरवठा बाधित राहणार आहे .
यादरम्यान जवळपास ५ झोन मधील बराचश्या भागांचा पाणीपुरवठा बाधित राहणार आहे आणि बरेचसे जलकुंभ रिकामे राहणार आहे ., त्यामुळे टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नसल्याने, नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी ह्या भागातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे कि त्यांनी परिवाराच्या वापराकरिता पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे.
For more information about water supply consumers can contact OCW Helpline No 1800 266 9899.