Published On : Tue, Oct 4th, 2022
By Nagpur Today Nagpur News

२४ तास शटडाऊन: वांजरी आणि कळमना जलकुंभाचा पाणीपुरवठा ऑक्टोबर ७ रोजी राहणार बंद

Advertisement

शट डाऊन दरम्यान टँकर द्वारे देखील पाणीपुरवठा होणार नाही

नागपूर : नागपूर महानगर पालिका आणि OCW नेहरू नगर झोन ह्यांनी नवीन टाकलेले नवीन बाय -पास जलवाहिनी चार्ज करण्यासाठी तसेच वांजरा रेल्वे लाईन खाली असलेली जुनी जलवाहिनी (मोठी गळती असलेली) कायमची बंद करण्यासाठी २४ तास अवधी चा शटडाऊन येत्या दि ऑक्टोबर ७ (शुक्रवार ) सकाळी १० ते ऑक्टोबर ८ (शनिवार ) सकाळी १० पर्यंत घेण्याचे ठरविले आहे. ह्या शटडाऊन दरम्यान सतरंजीपूरा नगर झोन अंतर्गत येणारे २ जलकुंभ ( वांजरी आणि कळमना जलकुंभ ) मधील पाणीपुरवठा बाधित राहणार आहे .

Advertisement
Wenesday Rate
Friday 27 Dec. 2024
Gold 24 KT 76,800/-
Gold 22 KT 71,400/-
Silver / Kg 89,100/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आपल्या माहितीकरिता नागपूर महानगर पालिका आणि OCW नेहरू नगर झोन ह्यांनी हा शटडाऊन आधी २८ सप्टेंबर ला जाहीर केला होता, परंतु २७ सप्टेंबर ला आलेल्या अचानक मुसळधार पावसामुळे सर्व यंत्रणा कोलमडली आणि आंतरजोडणी करण्याच्या दोन्ही ठिकाणी (शटडाऊन तांत्रिक कामाच्या जागेवर) च्या जागेवर खूप पाणी साचल्यामुळे तेथे काम धोकादायक झाले होते . त्यामुळे २७ तारखेचा शटडाऊन आता पुढे ढकलून येत्या दि ऑक्टोबर ७ (शुक्रवार ) सकाळी १० ते ऑक्टोबर ८ (शनिवार ) सकाळी १० पर्यंत घेण्याचे ठरविले आहे.

सतरंजीपूरा झोन मधील या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा बाधित राहणारे भाग पुढीलप्रमाणे:

वांजरी जलकुंभ : राजीव गांधी नगर, संतोष नगर, कुंदनलाल गुप्ता नगर, विनोबा भावे नगर, नागसेनवन , वनदेवी नगर, बेले नगर, कामना नगर, वैभव लक्ष्मी नगर, मेमन कॉलोनी, वैष्णोदेवी नगर गुलशन नगर, पांडुरंग नगर, बबळेश्वरी नगर , देवी नगर, त्रिमूर्ती नगर आणि वांजरी जुनी वस्ती.

कळमना NIT जलकुंभ : कळमना वस्ती , गणेश नगर, समाज एकता नगर, वाजपेयी नगर, नागराज नगर, म्हाडा कॉलोनी आणि नजीकचा भाग

शटडाऊन कालावधी दरम्यान आणि नंतर देखील बाधित भागांना टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी ह्या भागातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे कि त्यांनी परिवाराच्या वापराकरिता पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे…

अधिक माहितीकरिता नागपूर महानगरपालिका -च्या मदत क्रमांक १८००-२६६-९८९९ वर नागरिक केव्हाही संपर्क करू शकतात .

For more information about water supply consumers can contact OCW Helpline No 1800 266 9899.

Advertisement