नागपूर: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी बस्तरवारी १, २अ, व २ब जलकुंभावर ७००मिमी इनलेट फीडरवर आंतरजोडणीसाठी ३ जानेवारी रोजी २४ तासांचे शटडाऊन घेण्याचे ठरविले आहे.
२४ तासांच्या या शटडाऊनचे काम ३ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता सुरु होऊन ४ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता पूर्ण होईल. या दरम्यान खालील भागांचा पाणीपुरवठा बाधित राहील.
बस्तरवारी १ जलकुंभ:- लालगंज, तेलीपुरा पेवठा, कैमी बाग, प्रेम नगर, नारायणपेठ, श्रीरामवाडी, धी बाजार, दलालपुरा चौक, खैरीपुरा, झाडे चौक,
बस्तरवारी २अ जलकुंभ:- मेहेंदी बाग, किनखेडे लेआऊट, जामदारवाडी, वृंदावन नगर, शाहू मोहल्ला, कुंदनलाल गुप्त नगर, पोळा मैदान, नामदेव नगर, इंदिरा नगर, कोलबास्वामी नगर, पाठराबेवाडी, जोशीपुरा, सोनारटोली, आनंद नगर, हुडो कॉलोनी, कांजी हाऊस चौक.
बस्तरवारी २ब जलकुंभ:- बांगलादेश, तांदपेठ, नाईकतलाव, संभाजी कासार, मुसलमानपुरा, लेंडी तलाव, लाडपुरा, नंदगिरी रोड, स्वीपर कॉलोनी, ठक्करग्राम, पाचपावली, विणकर कॉलोनी, मराठा चौक, चकना चौक.
बिनाकी २ जलकुंभ:- पंचवटी नगर, धम्मदीप नगर, बोकडे लेआऊट.
शटडाऊन दरम्यान टँकरद्वारेही पाणीपुरवठा बंद राहणार असल्याने मनपा-OCW ने नागरिकांना पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल मनपा-OCW दिलगीर आहेत.