Published On : Thu, Oct 12th, 2023
By Nagpur Today Nagpur News

२४ तास शट डाऊन  : प्रतापनगर जलकुंभाचा पाणीपुरवठा राहणार बाधित

अमृत अंतर्गत बांधलेल्या नवीन प्रतापनगर जलकुंभाच्या' आंतरजोडणी करिता ऑक्टोबर  १३ ला शटडाऊन
Advertisement

नागपूर:नागपूर महानगर पालिकेने अमृत योजनेअंतर्गत नवीन बांधलेल्या शांतिनिकेतन कॉलोनी स्थित प्रताप नगर जलकुंभ (लक्ष्मी नगर  झोन-) ह्यांचे मुख्य जलवाहिनीला आंतरजोडणी करिता ऑक्टोबर १३ (शुक्रवार ) सकाळी ९  ते ऑक्टोबर १४ (शनिवार ) सकाळी ९ पर्यंत प्रतापनगर जलकुंभाचे (विद्याविहार कॉलोनी) शटडाऊन घेण्याचे ठरविले आहे .  नवीन प्रताप नगर जलकुंभ  ६००x ६०० मी मी व्यासाच्या आंतरजोडणी करिता २४ तासांचा  चा तांत्रिक  शटडाऊन अपेक्षित आहे.

ह्या कामादरम्यान ऑक्टोबर १३ (शुक्रवार ) सकाळी ९  ते ऑक्टोबर १४ (शनिवार ) सकाळी ९ पर्यंत प्रतापनगर जलकुंभाचा पाणीपुरवठा बाधीत राहील तसेच तांत्रिक काम आटोपल्यावर  बाधित भागामध्ये पाणीपुरवठा १४ तारखेला संध्याकाळी पूर्ववत होईल

Gold Rate
Thursday 09 Jan. 2025
Gold 24 KT 78,700 /-
Gold 22 KT 73,200 /-
Silver / Kg 91,200 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

*ह्या  शटडाऊनमुळे  पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग*

*लक्ष्मी नगर झोन : प्रताप नगर जलकुंभ*  :  राणा प्रताप नगर, टेलिकॉम नगर, स्वावलंबी नगर, दीनदयाळ नगर, लोकसेवा नगर, अग्ने  ले आउट, पायोनियर सोसायटी, त्रिशरण नगर, जीवनछाया नगर, संचयनी  वसाहत, पूनम विहार, स्वरूप नगर , हावरे ले आउट, अशोक कॉलोनी, शास्त्री ले आउट, मालवीय नगर, गणेश कॉलोनी, एस इ  रेल्वे कॉलोनी, शांती निकेतन कॉलोनी, रामकृष्ण नगर, मिलिंद नगर, गौतम नगर, शिव  नगर, श्याम नगर, खामला  जुनी वस्ती, चांगदेव  नगर, सिंधी कॉलोनी, वेंकटेश नगर , कोतवाल नगर आणि नजीकचा परिसर

मनपाOCW यांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे. या काळात टँकरद्वारेही पाणीपुरवठा शक्य होणार नाही. नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल मनपा-OCW दिलगीर आहेत

अधिक माहितीकरिता नागपूर महानगरपालिका -च्या मदत क्रमांक १८००-२६६-९८९९ वर नागरिक केव्हाही संपर्क करू शकतात .

Advertisement