Published On : Sat, Jul 15th, 2023

बोरियापुरा जलवाहिनी आंतरजोडणी करिता जुलै १८ ला २४ तास शटडाऊन

बोरियापुरा मुख्य जलवाहिनी , बोरियापुरा जलकुंभ आणि वाहन ठिकाणं जलकुंभाचा पाणीपुरवठा राहणार बाधित
Advertisement

नागपूर: MRIDC ह्यांनी कडबी चौक ते गुप्ता आटा चक्की, मोमीनपुरा पर्यंत रेल्वे ओव्हरब्रीज बांधणार आहे . त्या करीता त्यांनी सध्या कार्यरत असलेल्या ६०० मी मी व्यासाच्या बोरियापुरा जलवाहिनीला रिप्लेसमेंट म्हणून ६०० मी मी व्यासाची नवीन जलवाहिनी टाकली आहे . नागपूर महानगरपालिका येत्या १८ तारखेला, मंगळवारी ह्या नवीन जलवाहिनीला रिसालदार आखाडा, मोमीनपुरा येथे आंतरजोडणी करण्याकरिता २४ तासांचे शटडाऊन घेण्याचे ठरविले आहे.

६०० मी मी x ६०० मी मी व्यासाच्या ह्या आंतरजोडणी करीता २४ तासांचा (१८ जुलै (मंगळवारी) सकाळी १० ते १९ जुलै (बुधवारी) सकाळी १०) पर्यंत चा तांत्रिक शटडाऊन अपेक्षित आहे .

Advertisement

ह्या शटडाऊनमुळे सतरंजीपूरा झोन मधील पाणीपुरवठा बाधित राहणारे भाग :

बोरियापूरा मुख्य जलवाहिनी : पंजाबी लाइन गुरुद्वारा , मोतीबाग रेल्वे क्वार्टर्स , मेयो हॉस्पिटल , सैफी नगर , अन्सार नगर, डॉबी नगर, मोमीनपुरा कब्रस्तान रोड , भानखेडा , दादरापुल टिमकी , चिमाबाई पेठ , टिमकी रंभाजी रोड, गोळीबार चौक, कुराडकर मोहल्ला, संपाटे मोहल्ला, दंडारे मोहल्ला , पाचपावली , शोभा खेत , बारसे नगर , ठक्करग्राम, नांदगिरी रोड , कुंभारपूरा , पिली मारबत , बंगाली पांजा , मस्कासाथ , परवारपूरा , अंनाज बाजार पोलीस चोकी , इतवारी , तेलीपुरा , मिरची बाझार चौक , रेशम ओली , इतवारी रेल्वे स्टेशन , मारवाडी चौक .

बोरियापूरा जलकुंभ: मोमीनपुरा , MLC कॅन्टीन , कमल बाबा दर्गाह , हंसापुरी, बगवाघर चौक , शेख बारी चौक, नालसाब चौक , काला झंडा टाकिया , लाल स्कूल , चमाँर गली , गुलाब बाबा स्कूल, कोसारकर मोहल्ला , नंदबावाजी दोहा , देवघरपुरा , गांजाखेत चौक, बाजीराव गली , मस्कासाथ, तीन नळ चौक, चुना ओळी , खैरीपुरा भिशीकर मोहल्ला , भाजी मंडी टांगा स्टॅन्ड , समता बुद्ध विहार , लोहा ओळी , बर्तन ओली , लाड पुरा , मसुरकर चौक .

वाहन ठिकाना : लष्करीबाग

मुख्य ग्राहक : मेयो हॉस्पिटल, बेली शॉप SECR , मोतीबाग , इतवारी रेल्वे स्टेशन…

मनपा-OCW यांनी नागरिकांना सहकार्याचे आवाहन केले आहे. या काळात टँकरद्वारेही पाणीपुरवठा शक्य होणार नाही. नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल मनपा-OCW दिलगीर आहेत

अधिक माहितीकरिता नागपूर महानगरपालिका -च्या मदत क्रमांक १८००-२६६-९८९९ वर नागरिक केव्हाही संपर्क करू शकतात