Published On : Tue, Sep 27th, 2022
By Nagpur Today Nagpur News

२४ तास शटडाऊन: वांजरी आणि कळमना जलकुंभ चा पाणीपुरवठा २८ सप्टेंबर रोजी राहणार बंद

शट डाऊन दरम्यान टँकर द्वारे देखील पाणीपुरवठा होणार नाही

नागपूर : नागपूर महानगर पालिका आणि OCW नेहरू नगर झोन ह्यांनी नवीन टाकलेले नवीन बाय -पास जलवाहिनी चार्ज करण्यासाठी तसेच वांजरा रेल्वे लाईन खाली असलेली जुनी जलवाहिनी (मोठी गळती असलेली) कायमची बंद करण्यासाठी २४ तास अवधी चा शटडाऊन येत्या दि २८ सप्टेंबर (बुधवार ) सकाळी १० ते २९ सप्टेंबर (गुरुवार) सकाळी १० पर्यंत घेण्याचे ठरविले आहे. ह्या शटडाऊन दरम्यान सतरंजीपूरा नगर झोन अंतर्गत येणारे २ जलकुंभ ( वांजरी आणि कळमना जलकुंभ ) मधील पाणीपुरवठा बाधित राहणार आहे .

Gold Rate
Monday 10 Feb. 2025
Gold 24 KT 85,600 /-
Gold 22 KT 79,600 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

सतरंजीपूरा झोन मधील या शटडाऊनमुळे पाणी पुरवठा बाधित राहणारे भाग पुढीलप्रमाणे:
वांजरी जलकुंभ : राजीव गांधी नगर, संतोष नगर, कुंदनलाल गुप्ता नगर, विनोबा भावे नगर, नागसेनवन , वनदेवी नगर, बेले नगर, कामना नगर, वैभव लक्ष्मी नगर, मेमन कॉलोनी, वैष्णोदेवी नगर गुलशन नगर, पांडुरंग नगर, बबळेश्वरी नगर , देवी नगर, त्रिमूर्ती नगर आणि वांजरी जुनी वस्ती.

कळमना NIT जलकुंभ : कळमना वस्ती , गणेश नगर, समाज एकता नगर, वाजपेयी नगर, नागराज नगर, म्हाडा कॉलोनी आणि नजीकचा भाग

शटडाऊन कालावधी दरम्यान आणि नंतर देखील बाधित भागांना टँकरद्वारेही पाणीपुरवठा होऊ शकणार नाही. नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी ह्या भागातील सर्व नागरिकांना विनंती केली आहे कि त्यांनी परिवाराच्या वापराकरिता पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे…

अधिक माहितीकरिता नागपूर महानगरपालिका -च्या मदत क्रमांक १८००-२६६-९८९९ वर नागरिक केव्हाही संपर्क करू शकतात .

For more information about water supply consumers can contact OCW Helpline No 1800 266 9899.

Advertisement