Published On : Fri, Oct 30th, 2020

२४ तासांचे कन्हान जलशुद्धीकरण केंद्राचे शटडाऊन २ नोव्हेंबर रोजी; २८ जलकुंभांचा पाणीपुरवठा प्रभावित..

Advertisement

लकडगंज, सतरंजीपुरा, नेहरू नगर, आशी नगर झोन्समधील २८ जलकुंभांचा पाणीपुरवठा राहणार बाधित…

शटडाऊन दरम्यान आणि नंतर बाधित भागांत टँकर पुरवठा ही बंद…

Gold Rate
04 April 2025
Gold 24 KT 90,500/-
Gold 22 KT 84,200 /-
Silver / Kg - 93,500 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

नागपूर: नागपूर महानगरपालिका व ऑरेंज सिटी वॉटर यांनी कन्हान जलशुद्धीकरण केंद्र येथे गळती दुरुस्ती व इतर प्रतिबंधात्मक देखभालीची कामे करण्यासाठी २ नोव्हेंबर २०२० सकाळी ११ ते ३ नोव्हेंबर २०२० सकाळी ११ दरम्यान २४ तासांचे शटडाऊन घेण्याचे ठरविले आहे.

या कामा दरम्यान या कामांमुळे लकडगंज, सतरंजीपुरा, नेहरू नगर, आशी नगर झोन्समधील २८ जलकुंभांचा पाणीपुरवठा बाधित राहणार आहे.

या शटडाऊन काळात खालील कामे प्रस्तावित आहेत:

१. केंद्राच्या कच्च्या पाण्याच्या इनलेटवर फ्लो मीटर बसविणे

२. कलमना जलकुंभ परिसरात ७००मिमी फीडर मेनवर २ एंड प्लेट बसविणे व नागोबा मंदिरजवळ व्हॉल्व बसविणे.

३. कन्हान ९०० मिमी फीडरवरील कॅन्सर हॉस्पिटलच्या समोरील गळती दुरुस्ती

४. लकडगंज जलकुंभ परिसरात बायपास लाईनवरील गळतीची दुरुस्ती

५. लकडगंज जलकुंभाच्या ब्रांच फीडर व्हॉल्व ची प्रतिबंधात्मक देखभाल

या कामामुळे खालील जलकुंभांचा पाणीपुरवठा २ नोव्हेंबर सकाळी ११ ते ३ नोव्हेंबर सकाळी ११ दरम्यान बाधित राहील:

आशी नगर झोन: बेझनबाग जलकुंभ, बिनाकी एग्झीस्टिंग, बिनाकी १ व २, इंदोरा १ व २, गमदूर डायरेक्ट टॅपिंग, आकाशवाणी डायरेक्ट टॅपिंग, जसवंत टॉकीज डायरेक्ट टॅपिंग

सतरंजीपुरा झोन: बस्तरवारी १, २अ व २ब, शांती नगर जलकुंभ, वांजरी (विनोबा भावे नगर), इटाभट्टी डायरेक्ट टॅपिंग

नेहरू नगर झोन: नंदनवन (जुने) जलकुंभ, नंदनवन १ व २, सक्करदरा १, २ व ३, ताजबाग व खरबी जलकुंभ

लकडगंज झोन: भांडेवाडी, देशपांडे लेआऊट (भरतवाडा), लकडगंज, मिनिमाता नगर, सुभान नगर, कळमना, व पारडी १ व २ जलकुंभ

यादरम्यान shutdown दरम्यान टँकरद्वारेही पाणीपुरवठा होणार नसल्याने नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून सहकार्य करावे, अशी विनंती नागपूर महानगर पालिका आणि ocw ह्यांनी संयुक्तरीत्या केली आहे.

Advertisement
Advertisement