Published On : Wed, Sep 2nd, 2020

मेयोतील 26 टक्के मृत्यु हे ‘ब्रॉट डेड’

Advertisement

00

नागपूर : इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयमधील 28 ऑगस्ट पर्यंतच्या रुग्णांच्या मृत्यूबाबतचे विश्लेषण पाहता 327 कोरोना मृत्यूपैकी 87 मृत्यू म्हणजे 26.6 टकके मृत्यू हे रूग्णालयात पोहोचण्यापूर्वीच(brought dead) झाले असल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केले आहे.

एकूण 87 मृत्यू पैकी- 73 आकस्मिक मृत्यू आहेत. तर उर्वरित अन्य कारणाने मृत्यू झाले आहेत. 87 मृत्यूचे विश्लेषण पुढीलप्रमाणे आहे.

Gold Rate
08 April 2025
Gold 24 KT 88,100/-
Gold 22 KT 81,900/-
Silver / Kg - 90,600/-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

आत्महत्येमुळे-8, वाहून गेल्याने-2, रस्ते अपघातात-1, रेल्वे अपघातात-1, इमारतीवरुन उडी घेवून-1, अन्य हॉस्पिटलमधून रुग्णालयात दाखल करताना मृत्यू-1, आकस्मिक मृत्यू-73 अशाप्रकारे 87 लोकांचा मृत्यू झाला आहे. आकस्मिक मृत्यूमध्ये श्वसनाचा आजार, ताप, हृदयविकार, अस्थमा, मधूमेय, उच्च रक्तदाब अशा आजारामुळे झालेल्या मृत्यूचा समावेश आहे.

यापैकी शहरातून 83 रूग्ण तर ग्रामीणमधून 2 तर अन्य भागातुन 2 दोन रूग्ण होते. वयोगटानुसार विश्लेषण पाहीले तर 51 ते 60 या वयोगटात 26 तर त्याखालोखाल 61 ते 70 या वयोगटात 19 तर 41 ते 50 या वयोगटात 19 तर 41 ते 50 वयोगटात 16 मृत्यू आहेत. 21 ते 30 मध्ये 1 तर 70च्यावर 6 मृत्यू असल्याचे आढळून आले.

कोरोना काळामध्ये मृत्यूचे आकडे पुढे येताना सगळेच मृत्यू कोरोनामुळेचे झाले असे नाही. असाही खुलासा मेयो रुग्णालयामार्फत करण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement