नागपूर: नागपूर महानगरपालिकेतील विविध विभागात विविध पदावर कार्यरत असलेले २६ अधिकारी-कर्मचारी शनिवारी (ता. ३१) सेवानिवृत्त झाले. या सर्वांचा मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात आयोजित एका समारंभात सत्कार करण्यात आला.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे सहायक अधीक्षक मनोज कर्णिक, दत्तात्रय डहाके, सहायक अग्निशमन अधिकारी केशव कोठे, जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर, कर्मचारी नेते राजेश हाथीबेड, डोमाजी भडंग, संजय बागडे उपस्थित होते. यावेळी सर्व सत्कारमूर्तींचा शाल, श्रीफळ, तुळशीरोपटे, स्मृतीचिन्ह आणि धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त सत्कारमूर्तींमध्ये उपअभियंता (प्रकाश विभाग) सलीम इकबाल, ज्येष्ठ श्रेणी लिपिक (सा.प्र.वि.) श्रीमती व्ही. ए. गोंडाणे, कनिष्ठ निरीक्षक (स्थानिक संस्था कर विभाग) डी.बी. खंडाले, कनिष्ठ लिपिक (कर व कर आकारणी विभाग) इंदू वनमाले-चौधरी, मोहरीर सुरेश चतुरकर, कर संग्राहक जी.व्ही. पाटणकर, अन्न निरीक्षक सुधीर फटींग, अग्निशमन विभागातील उपअधिकारी पी. एन. कावळे, फायरमन मो. जमील हाजी अब्दुल सत्तार, फायरमन एस. एफ. चौधरी, मजदूर (जलप्रदाय विभाग) गंगाधर उकडे, अशोक मारबते, मुख्याध्यापक उषा शिंगडीलवार, मुख्याध्यापक मुमताज बेगम निजाम खान, सहायक शिक्षिका निशा बैस, किरण श्रीपात्री, धेनुमती नंदेश्वर, नसीम बानो अब्दुल सत्तार, आरती ठवकर, लोककर्म विभागातील रेजा देवकी मानकर, सफाई कामगार सकून समुंद्रे, पार्वती चहांदे, उषा खरे, शिला उसरबर्से, आशा मधुमटके, राजन भैय्यालाल नकवाल यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी केले. आभार राजेश हाथीबेड यांनी मानले.