नागपूर : चंद्रपुर जिल्ह्यात चिमूर निवासी अरुणा अभय काकड़े (वय ३६) गेल्या सात दिवसांपासून नागपुरातील गांधीबाग परिसरातील बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे.
माहितीनुसार, अरुणा अभय काकड़े या चंद्रपुर जिल्ह्यात चिमूर येथील रहिवासी आहे.महिलेचे देवांश जनरल स्टोर्स नावाचे दूकान असून त्या दुकानासाठी काही कॉस्मेटिक वस्तू घ्यायला २६ नोव्हेंबर रोजी त्या नागपुरात आल्या होत्या. तहसील पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गांधीबाग येथील नंगा पुतळा येथे पोहचल्या. दुपारी १२ वाजता महिलेने वऱ्याला फोन करून आपण नागपुरात पोहोचले असल्याची माहिती दिली. त्यानंतर महिलेचा फोन स्विच ऑफ झाला. सायंकाळ झाली तरी महिला घरी परतली नाही.
महिलेच्या पतीने पत्नी घरी पोहोचली नसल्याने चिमूर पोलीस स्टेशन गाठले. चिमूर पोलिसांनी नागपुर गांधीबाग येथील तहसील पोलिसांना या तक्रार संदर्भात माहिती दिली. २६ नोव्हेंबर पासून पोलिसांनी महिलेचा तपास सुरु केला. मात्र अद्यापही महिला बेपत्ताच आहे.
अरुणाचा नवरा अभय काकड़े हा कोआपरेटिव बैंकेत मैनेजर असून तिला १२ वर्षाचा मुलगा आहे. या घटनेवरून कोणता अनुचित प्रकार तर घडला नाही ना ? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. तहसील पोलिसांनी युद्ध पातळीवर महिलेचा शोध घेण्यास सुरुवात केली असून महिलेच्या मोबाईवरून लोकेशनचा तपास करण्यात येत आहे.