Published On : Wed, Oct 2nd, 2024
By Nagpur Today Nagpur News

नागपुरातील नरखेड तालुक्यात एकाच कुटुंबातील ४ जणांनी केली सामूहिक आत्महत्या !

आर्थिक अडचणीमुळे उचलले पाऊल
Advertisement

नागपूर : जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील मोहड गावात एकाच कुटुंबातील चौघांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. विजय मधुकर पाचोरी, त्यांची पत्नी माला आणि दोन मुले गणेश आणि दीपक अशी मृतांची नावे आहेत. बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली आणि तपास सुरू केला. विजय पाचोरी हे 2016 मध्ये सेवानिवृत्त झालेले शिक्षक होते. तर मोठा मुलगा गणेश हा पांढुर्णा येथील बँकेत कामाला होता. मात्र काही काळापूर्वी त्याच्यावर आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला अटकही करण्यात आली होती.

Gold Rate
Wednesday 12 March 2025
Gold 24 KT 86,400 /-
Gold 22 KT 80,400 /-
Silver / Kg 98,300 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महिनाभरापूर्वीच त्याची जामिनावर सुटका झाली. तर दुसरा मुलगा दीपक एमपीएससी परीक्षेची तयारी करत होता. हे कुटुंब आर्थिक अडचणीत असल्याचे सांगण्यात येत आहे, मात्र कुटुंबातील चारही सदस्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Advertisement