Published On : Wed, Sep 18th, 2024
By Nagpur Today Nagpur News

उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई
Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. मंगळवार (17) रोजी शोध पथकाने 40 प्रकरणांची नोंद करून 33,900/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 800/- रुपयांची वसुली करण्यात आली.

दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 400/- रुपयांची वसुली करण्यात आली. मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 4,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 6 प्रकरणांची नोंद करून 12,500/- रुपयांची वसुली करण्यात आली.

Advertisement
Wenesday Rate
Saturday 28 Dec. 2024
Gold 24 KT 76,600/-
Gold 22 KT 71,200/-
Silver / Kg 82,200/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी टाकणे या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 2,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 16 प्रकरणांची नोंद करून 3,200/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 11 प्रकरणांची नोंद करून 11,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे.

तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन झोन अंतर्गत मे. मिंलीद चव्हाण यांच्यावर बांधकामाचे साहित्य रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. नेहरू नगर झोन अंतर्गत मे. मेट्रो डेकोर शॉप यांनी दुकानचा कचरा रस्त्यावर टाकल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. वंजारी किराणा स्टोर्स यांच्यावर प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. उपद्रव शोध पथकाने 3 प्रकरणांची नोंद करून रू. 15,000/- दंड वसूल केला.

Advertisement