नागपूर : शहरात गेल्या २४ तासात दोन हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. एकीकडे सख्या भावाने आपल्या मनोरुग्ण बहिणीची हत्या केली. तर दुसरीकडे जरीपटका पोलिस स्टेशन अंतर्गत मोतिबाग़
परिसरात अल्पवयीन बालकाने एका कचरा वेचणाऱ्या इसमावर तलवारीने 15 वेळा वार करून त्यांची हत्या केली. शेखर (वय ४०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
माहितीनुसार, शेखर हा रस्त्यावर फुटपाथवर झोपायचा. तो कचरा वेचून आपल्या पोटापाण्याच्या खर्च करत होता. आरोपी अल्पवयीन बालकासोबत शेखरचा वाद झाला. हा वाद इतका चिघळला गेला की शेखरने बर्फ फोडण्याचा रॉडने अल्पवयीन बालकावर हल्ला केला. याच रागात विधिसंघर्ष बालकाने स्वतःच्या घरामधील जुन्या गंजलेल्या तलवारीने शेखरच्या शरीरावर 15 वेळा वर करत त्याची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करत पुढील तपास सुरु केला आहे.