कामठी :-स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या वारीसपुरा मार्गाहुन मारुती ओमनी क्र एम एच 31 बी बी 2773 ने 400 किलो गोमांस अवैधरित्या वाहून नेत असता पोलिसांनी वेळीच त्या वाहनावर धाड घालण्यात यश गाठल्याची कारवाही सायंकाळी 6 दरम्यान केली असून
या धाडीतून 400 किलो गोमांस किमती 48 हजार रुपये व जप्त मारुती ओमनी किमती 60 हजार रुपये असा एकूण 1 लक्ष 8 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत पसार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
ही यशस्वी कारवाही डी सी पी निलोत्पल, एसीपी राजरतन बन्सोड,यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास कठाळे, गुन्हे पोलीस निरीक्षक परदेसी, मनोहर राऊत, विक्की गजभिये, डी बी स्कॉड चे रोशन पाटील , पवन गजभिये, अंकुश गजभिये, किशोर गांजरे यांनी केले असून पुढील तपास सुरू आहे
संदीप कांबळे