नागपूर: महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांसाठी आज एका टप्प्यात मतदान होत आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदारांना आपला मताधिकार बजावता येईल. दुपारी 3 वाजेपर्यंत नागपूर जिल्ह्यात 44.45 टक्के मतदान झाले.अत्यंत संथगतीने सुरू झालेल्या मतदान प्रक्रियेला आता वेग येऊ लागला आहे.नागपूर जिल्ह्यात दोन तासानंतर सुमारे 13 टक्क्यांनी वाढ झाली.
दरम्यान महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांसाठी सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 पर्यंत मतदान प्रक्रिया सुरू असणार आहे. पहाटेपासूनच मतदारांनी मतदान केंद्राबाहेर रांगा लावण्यास सुरूवात केल्याचं पाहायला मिळत आहे. तर आज राज्यभरातील विविध मतदारसंघात किती टक्के मतदान झाले याची आकडेवारी दर दोन तासांनी समोर आले आहे.
दुपारी ३:00 वाजेपर्यंतची अंदाजे सरासरी टक्केवारी ४४.४५ %
हिंगणा ४३.३८ %
कामठी ४३.२४ %
काटोल ४३.२० %
नागपूर मध्य ४१.१० %
नागपूर पूर्व ४४.९७ %
नागपूर उत्तर ४१.०१ %
नागपूर दक्षिण ४३.४० %
नागपुर दक्षिण पश्चिम ४१.७६ %
नागपूर पश्चिम ४०.९३ %
रामटेक ५१.१८ %
सावनेर ५०.३८ %
उमरेड ५४.०४ %