Advertisement
नागपूर- महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामांकन दाखल करावयाच्या पहिल्या दिवशी आज (दि.२२) इच्छुकांकडून ४६२ अर्जांची उचल करण्यात आली.
विधानसभा निवडणुकीची अधिसूचना २२ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाल्यानंतर नामनिर्देशन प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नामांकन दाखल करावयाच्या पहिल्या दिवशी जिल्ह्यातील काटोल विधानसभा मतदारसंघात २८ अर्ज, सावनेर विधानसभा मतदारसंघात १८ अर्ज, हिंगणा विधानसभा मतदारसंघात २४ अर्ज, उमरेड विधानसभा मतदारसंघात ३५ अर्ज, नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात ४१ अर्ज, नागपूर दक्षिण ३८, नागपूर पूर्व विधानसभा ४७, नागपूर मध्य ९९, नागपूर पश्चिम ३३, नागपूर उत्तर ५२, कामठी विधानसभा २९, रामटेक १८ अर्ज असे एकुण बारा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांकडून ४६२ अर्जांची उचल करण्यात आली आहे. आज एकही नामांकन दाखल करण्यात आलेले नाही.