Advertisement
नागपूर: रविवारी जुनी कामठी परिसरात ५० वर्षीय इसमाने केवळ ६ वर्षे वयाच्या मुलीवर कारमध्ये बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी आरोपी विलास रामचंद्र वाहुरकलर याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येरखेडा, कामठी येथील निवासी विलास रामचंद्र वाहुरकर याने आपल्या घराजवळच खेळणाऱ्या मुलीला जवळ बोलावले. तिला बाजूला उभ्या असलेल्या मारुती ८०० कारमध्ये बोलावून तिच्यासोबत अश्लील चाळे व लैंगिक छळवणूक केली. हा प्रकार रविवारी साडेतीनच्या सुमारास घडला. त्यानंतर सदर मुलीने घडलेला प्रकार आपल्या पालकांना सांगितला.
मुलीच्या पालकांनी नोंदवलेल्या तक्रारीच्या आधारे जुनी कामठी पोलिसांनी विलास वाहुरकर याच्यावर भां. द. वि. च्या कलाम ३७६ व सहकलम ३ आणि ४ पोक्सो ऍक्ट अन्वये गुन्हा दाखल केला आहे.