नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. गुरूवार (23) रोजी शोध पथकाने 59 प्रकरणांची नोंद करून 38,500/- रुपयाचा दंड वसूल केला. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 8 प्रकरणांची नोंद करून 3,200/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 7 प्रकरणांची नोंद करून 2,800/- रुपयांची वसुली करण्यात आली.
मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 2,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 7 प्रकरणांची नोंद करून 10,500/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 25 प्रकरणांची नोंद करून 5,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 10 प्रकरणांची नोंद करून 10,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. सार्वजनिक ठिकाणी ओला किंवा सुका, कचरा जाळून उपद्रव निर्माण करणे या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 5,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने धरमपेठ झोन अंतर्गत मे. धन्वंतरी हाईटस यांनी परवानगीशिवाय सर्व्हिस रोड खोदल्यामुळे 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. हनुमान नगर झोन अंतर्गत संगम टेड्रर्स यांनी दुकानातून बंदी असलेल्या तंबाखूच्या वस्तूंची विक्री केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. धंतोली मे. शिव अमबिअन्स यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्याच्या कडेला टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. मंगळवारी झोन मे. सनटेक इन्फा इस्टेट प्रा. एलटिडी यांनी शेजारच्या घराच्या पार्कींगमध्ये मोडतो वस्तू आणि टाकाऊ बांधकाम साहित्य फेकल्यामुळे रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. उपद्रव शोध पथकाने 4 प्रकरणांची नोंद करून रू. 30,000/- दंड वसूल केला.