नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, 79 मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवार (22) रोजी शोध पथकाने 65 प्रकरणांची नोंद करून 48,300/- रुपयाचा दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी, रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा, अशा ठिकाणी थुंकणे (रु. 200/- दंड) या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 400/- रुपयांची वसुली करण्यात आली. हाथगाडया, स्टॉल्स, पानठेले, फेरीवाले, छोटे भाजी विक्रेते यांनी लगतच्या परिसरात अस्वच्छता (रु. 400/- दंड) या अंतर्गत 20 प्रकरणांची नोंद करून 8,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. व्यक्तीने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे(रु. 100/- दंड) या अंतर्गत 2 प्रकरणांची नोंद करून 200/- रुपयांची वसुली करण्यात आली. दुकानदाराने रस्ता, फुटपाथ, मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे (रु. 400/- दंड) या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 400/- रुपयांची वसुली करण्यात आली.
मॉल, उपहारगृहे, लॉजिंग, बोर्डींग हॉटेल, सिनेमा हॉल, मंगल कार्यालय, कॅटरर्स सर्व्हीस प्रोव्हायडर इत्यादींनी रस्ता या अंतर्गत 1 प्रकरणांची नोंद करून 2,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. वाहतूकीचा रस्ता मंडप, कमान, स्टेज इत्यादी रचना करुन अथवा वैयक्तिक कामाकरीता बंद करणे या अंतर्गत 16 प्रकरणांची नोंद करून 25,500/- रुपयांची वसुली करण्यात आली. वर्कशाप, गॅरेजेस व इतर दुरुस्तीचे व्यवसायीकांने रस्ता, फुटपाथ मोकळी जागा अशा ठिकाणी कचरा टाकणे या अंतर्गत 3 प्रकरणांची नोंद करून 3,000/- रुपयांची वसुली करण्यात आली. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव व्यक्ती असल्यास 14 प्रकरणांची नोंद करून 2,800/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. उपरोक्त यादीत न आढळणारे इतर उपद्रव संस्था असल्यास 6 प्रकरणांची नोंद करून 6,000/- दंड वसूल करण्यात आलेला आहे. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
तसेच उपद्रव शोध पथकाने लक्ष्मीनगर झोन अंतर्गत मे. अन्ना ईडली यांनी कचरा अन्नपदार्थ टाकून चेंबरमध्ये अडथळा आणणे आणि हरित न्यायाधिकरण कायद्यांतर्गत दंड म्हणून मनपा आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल 10,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. तसेच मे. भारत नर्सरी यांनी नर्सरीची रोपवाटिका रस्त्याच्याकडेला टाकल्याबद्दल रू. 5,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच मे. राधाकृष्ण्ा हाईट्स यांनी बांधकामाचे साहित्य रस्त्याच्याकडेला टाकल्याबद्दल रू. 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल केला. धरमपेठ झोन अंतर्गत मे. बन्सल क्लासेस यांनी मनपा यांच्या विरूध्द विनापरवानगीशिवाय जवळच्या रस्त्याच्या कडेला बॅनर होर्डिंगचे प्रदर्शन केल्याबद्दल 10,000/- हजार रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.
तसेच मे. संजय बिकाजी पांडे यांनी जुने घर पाडताना योग्य सुरक्षा उपाययोजना न केल्यामुळे मनपा आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल 10,000/- हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोन अंतर्गत मे. संतोष स्वीट्स यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत मे. पवन सोनपापडी यांनी प्लास्टिक पिशवीचा वापर केल्याबद्दल 5,000/- हजार रुपयांचा दंड वसुल केला. लकडगंज झोन अंतर्गत जनाब मोहम्मद रफीक तसेच अमीत मधुकर यांनी कारखान्यातून ध्वनी प्रदूषण पसरवत असल्याचे मनपा आदेशाचे उल्लंघन (तक्रारीवरून) केल्याबद्दल प्रत्येकी रु. 5,000/- रुपयाचा असे एकुण रु. 10,000/- रुपयाचा दंड वसुल करण्यात आला. उपद्रव शोध पथकाने 9 प्रकरणांची नोंद करून रू. 65,000/- दंड वसूल केला.